वाहतुकीचा नियम मोडलात? 100 रुपयांत सुटू शकता, 'असा' आहे नियम

वाहतुकीचा नियम मोडलात? 100 रुपयांत सुटू शकता, 'असा' आहे नियम

वाहतुकीचे नियम कडक केल्यानं मोठ्या रकमेचे दंड आकारले जात आहेत. आता तुम्हीही हजारो रुपयांचे दंड भरण्यापासून वाचू शकता आणि तेसुद्धा नियमानुसार.

  • Share this:

मुंबई, 11 सप्टेंबर : देशात एक सप्टेंबरपासून नवा मोटार व्हेइकल कायदा लागू झाला आहे. यानुसार वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर मोठ्या रकमेची दंडात्मक कारवाई केली जात आहे. यामध्ये तब्बल 80 हजार रुपयांपर्यंतही दंड आकारला गेला आहे. मात्र, या मोठ्या दंडातून फक्त 100 रुपयांमध्ये वाचता येतं. तुम्हाला चिरीमिरी द्यायची नाही तर नियमानुसार 100 रुपये भरून तुम्ही सुटू शकता.

वाहतूक निरीक्षकानं पकडले आणि तुमच्याकडं विम्याची कागदपत्र, वाहन चालवण्याचा परवाना, वाहन नोंदणीची कागदपत्रे किंवा इतर महत्वाची कागदपत्रे नसतील तर तुम्हाला 100 रुपये देऊन सुटता येतं. यासाठी काही नियम आणि अटी आहेत.

तुमच्याकडे आवश्यक ती कागदपत्रे नसतील तर तुम्हाला 15 दिवसांचा वेळ मिळेल. याकाळात तुम्ही संबंधित शाखेमध्ये ती कागदपत्रे दाखवून तुमचा दंड रद्द करू शकता. यासाठी तुम्हाला 100 रुपये द्यावे लागतील.

दंडाची रक्कम तेव्हाच माफ होईल जेव्हा तुमच्या कागदपत्रांची शहानिशा केली जाईल. यासाठी एकच अट आहे ती म्हणजे तुम्ही पकडला गेला तेव्हा आवश्यक असणारी कागदपत्रे घरी किंवा इतर ठिकाणी विसरला असाल. तसेच तुमचे कागद संबंधित अधिकाऱ्यांनी तपासल्यानंतर दंड आणि पावती रद्द केली जाईल. या सर्व प्रक्रियेसाठी फक्त 100 रुपये आकारले जातात.

ट्राफिक पोलिसांनी अडवलं तर बिनधास्त करा VIDEO, तुमच्याकडे आहेत 'हे' अधिकार

मोटार वाहन कायदा नियमात आणि त्यांचे उल्लंघन केल्यावर होणाऱ्या दंडात्मक कारवाईत बदल करण्यात आले आहेत. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या दृष्टीने हा कायदाबदल आहे. पात्रता नसतानाही गाडी चालवणाऱ्यांना इतके दिवस 500 रुपये दंड होत होता. तोच आता 10 हजार रुपये झाला आहे. दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांकडून 2000 रुपये दंड वसूल केला जात होता. तोही आता 10000 रुपयांवर गेला आहे. लायसन्स बरोबर नसेल तर 500 ऐवजी आता 5000 रुपये दंड द्यावा लागेल. त्यामुळे गाडी चालवताना बरीच खबरदारी घ्यावी लागणार आहे.

ट्राफिक पोलिसांनी अडवलं तर तुमच्याकडे आहेत 'हे' अधिकार!

वाहतूक पोलिसाची मुजोरी! सर्वसामान्यावर दमदाटी करत मारली लाथ VIDEO VIRAL

Published by: Suraj Yadav
First published: September 11, 2019, 4:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading