ट्राफिक पोलिसांनी अडवलं तर बिनधास्त करा VIDEO, तुमच्याकडे आहेत 'हे' अधिकार

मोटार वाहन कायदा लागू झाल्यानंतर वाहतुक सुरक्षा कडक करण्यात आली असून पोलिसांनी मोठ्या रकमेचे दंडही केले असल्याचं समोर आलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 9, 2019 12:57 PM IST

ट्राफिक पोलिसांनी अडवलं तर बिनधास्त करा VIDEO, तुमच्याकडे आहेत 'हे' अधिकार

नवा मोटार वाहन कायदा लागू झाल्यानंतर दंडाची रक्कम वाढवण्यात आली आहे. त्यामुळं पोलीसांनीसुद्धा कडक मोहिम राबली आहे. दरम्यान अनेक ठिकाणी पोलीसांनी दमदाटी केल्याचे व्हिडिओसुद्धा व्हायरल झाले आहेत.

वाहन धारकांनी नियम मोडले तरीही त्यांचे काही अधिकार आहेत. कोणत्याही पोलीसांना वाहनधारकाशी गैरवर्तन करता येणार नाही. यावेळी जर तुम्ही व्हिडिओ करत असाल तर तुमचा मोबाइल हिसकावून घेण्याचाही अधिकार पोलिसांना नाही. हरियाणात माहितीच्या अधिकाराखाली ही माहिती देण्यात आली आहे.

चालकांना मोबाईलवर कागदपत्रं दाखवता येणार आहे. तसेच गाडीमध्ये हॉकी स्टीक, बॅट, स्टम्प हे ठेवता येईल मात्र हत्यारांना बंदी आहे.

खासगी वाहनातून जर व्यवसायाच्या दृष्टीनं काही सामनाची वाहतूक होत असेल तर त्याच्या खरेदीची कागदपत्रं चेक करण्याचा अधिकार पोलिसांना आहे.

वाहन चालवताना चालक आणि त्याच्यासोबत असेलेल्या व्यक्तिने सिट बेल्ट लावणं बंधनकारक आहे. मात्र, गर्भवती महिला किंवा दुखापत असलेल्यांना यामधून सूट देण्यात आली आहे.

Loading...

नव्या मोटार व्हेइकल अॅक्टला लागू केल्यानंतर वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणं महागात पडू शकतं. नव्या अॅक्टनुसार वाहुतकीचे नियम मोडल्यास दंड म्हणून मोठी रक्कम भरावी लागते. नव्या कायद्यानुसार पोलिस याची अंमलबजावणी करत आहेत. नियम मोडणाऱ्यांकडून मोठी पावती फाडली जात आहे.

वाहतुकीच्या नियमांचं पालन करणं आपली जबाबदारी आहे. मात्र नियमांचा वापर करून पोलिस तुम्हाला त्रास देऊ शकत नाहीत. त्यांना कोणत्याही प्रकारे तुमच्याशी गैरवर्तन करता येणार नाही. याशिवाय तुम्हाला वाहन धारक म्हणून असलेल्या अधिकारांची माहिती असायला हवी.

वाहतुक निरीक्षक तुम्हाला थांबवू शकतात. जसे तुमच्यासाठी काही नियम आहेत तसेच त्यांच्यासाठीही नियम आहेत. ते नियम वाहतुक निरीक्षकांनी पाळणं गरजेचं असतं. प्रत्येक वाहतूक पोलीस त्यांच्या गणवेशात असणं बंधनकारक आहे. त्यावर त्यांचा बक्कल नंबर आणि नाव असायलाच हवं. या गोष्टी नसतील तर तुम्ही त्यांच्या ओळखपत्राची मागणी करून शकता. त्यांनी ओळखपत्र दाखवण्यास नकार दिल्यास तुमच्या गाडीची कागदपत्रं त्यांना देऊ नका.

तुम्हाला एखादा नियम मोडल्याबद्दल दंड झाल्यास त्याची पावती घ्या. वाहतूक पोलिसांकडे पावती बूक किंवा   ई- पावती नसेल तर दंड वसूल करता येणार नाही.

वाहतूक पोलीस अडवतात तेव्हा गाडी रस्त्याच्या एका बाजूला नीट लावा. त्यानंतर गाडीचे कागदपत्रं दाखवा. तुमची कागदपत्रं पोलिसांकडं द्यायची नाहीत. यावेळी त्यांना सहकार्य करा तसेच त्यांनीसुद्धा तुमच्याशी योग्य पद्धतीनं संवाद साधला पाहिजे.

अनेकदा गाडी थांबवल्यानंतर वाहतूक पोलीस वाहनाची किल्ली काढून घेतात. त्यांना अशाप्रकारे किल्ली काढून घेण्याचा अधिकार नाही. तुम्ही वाद न घालता त्यांच्याशी बोललं पाहिजे.

गाडी चुकीच्या ठिकाणी थांबवली असेल आणि तुम्ही गाडीत बसला असाल तर वाहतुक पोलिसांना गाडी उचलता येत नाही. नो पार्किंगमध्ये गाडी असेल आणि तुम्ही गाडीत नसाल तर वाहतूक पोलीस कारवाई करू शकतात.

वाहतुकीचे नियम मोडल्यास पोलीसांनी तुम्हाला ताब्यात घेतलं तर 24 तासांच्या आत न्यायालयात हजर करणं बंधनकारक आहे. तुम्हाला वाहतूक पोलिस त्रास देत असतील तर पोलिसांत तक्रार करू शकता.

वाहतूक पोलीस तुमच्याशी गैरवर्तन करत असतील तर त्याची लेखी तक्रार करता येते. याची तक्रार जिल्ह्याच्या वरिष्ठ पोलिस अधिक्षकांकडे करता येते.

पावती भरल्याचा अर्थ हा नाही की तुम्ही वाहतूक पोलीसांच्या चुकीच्या वर्तनाविरुद्ध तक्रार करू शकत नाही. पावती फाडली तरी तुम्हाला तक्रार करण्याचा अधिकार आहे. तुम्हाला अपमानास्पद वागणूक दिल्यास त्यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवू शकता. हाच अधिकार वाहतूक पोलिसांनादेखील आहे.

अनेकदा तुम्ही ड्रायव्हिंग लायसन, गाडीची महत्त्वाची कागदपत्रं घरी विसरता. मात्र, आता ही कागदपत्रं विसरलात तरी भीती बाळगू नका. सरकारने यासाठी एक अॅप सुरू केलं आहे. त्यामुळं कागदपत्रं जवळ असायलाच पाहिजे असं काही नाही.

कागदपत्रांऐवजी तुम्ही त्या अॅपमध्ये स्टोअर केलेली कागदपत्रं दाखवू शकता. डीजीलॉकर अॅप डाउनलोड करून तिथं तुम्ही स्टोअर करू शकता. हे अॅप पुर्णपणे सुरक्षित आहे.

DigiLocker App वर अनेक कागदपत्र स्टोअर करता येतात. यात गाडीची महत्त्वाची कागदपत्रे, पॅनकार्ड, पासपोर्ट, गुणपत्रके, प्रमाणपत्रे, याशिवाय इतर आवश्यक कागदपत्रे साठवून ठेवता येतात. तसेच कोणालाही पाठवण्याची सुविधा यामध्ये आहे.

डिजिलॉकरवर 1 जीबीपर्यंत स्टोरेज करता येते. तसेच तुमच्या गुगल, फेसबुकला हे लिंग करता येत असून कागदपत्रे वेगवेगळ्या फाइल टाइपमध्ये सेव्ह करता येतात. यात pdf, jpg, jpeg, png, bmp आणि gif  या फाइल टाइपचा समावेश आहे.

गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला डिजिलॉकरचे अकाउंट सुरू करावे लागेल. तुमच्या मोबाइल नंबरच्या सहाय्यानं रजिस्टर करून व्हेरिफिकेशननंतर तुमचं नाव आणि पासवर्ड टाकता येतो.

डिजिलॉकरवर गाडीच्या कागदपत्रांसह तुमची इतर महत्त्वाची कागदपत्रं साठवता येतील. ट्राफिक पोलिसांनी गाडी अडवली आणि तुमच्याकडं कागदपत्रं नसतील मात्र डिजिलॉकरला सेव्ह असतील तर दंड भरावा लागणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 9, 2019 12:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...