अबब! 59 हजार रुपयांचा दंड, वाहतुकीचे असे कोणते नियम मोडले?

अबब! 59 हजार रुपयांचा दंड, वाहतुकीचे असे कोणते नियम मोडले?

नव्या मोटार व्हेइकल अॅक्टची वाहतूक पोलिसांनी अंमलबजावणी सुरू केली आहे.

  • Share this:

गुरुग्राम, 04 सप्टेंबर : नुकताच एका स्कुटी धारकाला 23 हजार रुपयांची पावती फाडावी लागल्याचं समोर आलं होतं. आता हरियाणातील गुरुग्राम इथं एका वाहन धारकाला तब्बल 59 हजार रुपायांचा दंड केला आहे. ट्रॅक्टर आणि ट्रॉलीच्या मालकाने वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केलं.

मंगळवारी दुपारी गुरुग्राम इथं ट्राफीक पोलिसांनी ही कारवाई केली. यात वाहन चालवण्याचा परवाना नव्हता, विमा संरक्षण, वाहनाच्या नोंदणीची कागदपत्रे जवळ नव्हती. तसेच दारू पिऊन गाडी चालवताना दुचाकीला धडक दिली. या सर्वांचा मिळून दंड करण्यात आला आहे. अनेक शहरांत दंडाची मोठी रक्कम वसूल करण्यात आली आहे.

गुरुग्राममध्ये 2 सप्टेंबरमध्ये 950 तर 3 सप्टेंबरला 740 पावत्या फाडण्यात आल्या. हे नियम कठोर असायला हवेत आणि वाहन धारकांनी त्यांचं पालन करायला हवं असं गुरुग्रामच्या पोलीस अधिक्षकांनी म्हटलं आहे. सध्या 20 ते 25 हजार रुपयांची पावती फाडली जात आहे. जर तुम्ही पेपर नंतर दिले तर सॉफ्टवेअरमध्ये अपडेट करून पावती कमी होऊ शकते.

वाचा : ट्राफिक पोलिसांनी अडवलं तर तुमच्याकडे आहेत 'हे' अधिकार!

एका रिक्षाचालकाला 32 हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. त्याच्याजवळ वाहन नोंदणीची कागदपत्रे, डीएल, पोल्यूशन सर्टीफिकेट, विमा आणि नंबर प्लेट नसल्यानं दोषी ठरवण्यात आलं होतं.

नव्या मोटर व्हेइकल अॅक्टमध्ये दंड जास्त आहे की दुचाकी आणि चारचाकी धारक पॉप्युलेसन सर्टिफिकिटसाठी गर्दी केली जात आहे. पन्नास रुपयांच्या सर्टिफिकिटसाठी मोठा दंड होण्यापेक्षा ते काढलेलं केव्हाही चांगलं असं वाहनधारक मानत आहेत.

पाळणा चोरण्याच्या नादात बाळाला मॉलमध्येच विसरून आली महिला, CCTV व्हायरल

Published by: Suraj Yadav
First published: September 4, 2019, 4:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading