Elec-widget

सत्तास्थापनेचं केंद्र आता दिल्लीतून मुंबईत येणार, काँग्रेसच्या नेत्यांसाठी विशेष विमान

सत्तास्थापनेचं केंद्र आता दिल्लीतून मुंबईत येणार, काँग्रेसच्या नेत्यांसाठी विशेष विमान

काँग्रेस थेट शिवसेनेला पाठिंब्याचं पत्र देणार नाही तर काँग्रेस राष्ट्रवादीला पाठिंब्याचं पत्र देणार आहे. दोनही पक्ष नव्याने पत्र तयार करून त्यावर आमदारांच्या सह्या घेणार आहे.

  • Share this:

प्रशांत लीला रामदास, नवी दिल्ली 21 नोव्हेंबर : महाराष्ट्रातल्या सत्तेचा पेच सोडविण्यासाठी गेली काही दिवस दिल्लीत बैठकांचा रतीब सुरू होता. सगळ्या घडामोडींचं केंद्र हे राजधानी दिल्ली झालं होतं. त्याचं कारण म्हणजे सगळी चर्चा ही सोनिया गांधींभोवती फिरत होती. शिवसेनेसोबत काँग्रेसने यावं यावं यासाठी सगळेच ज्येष्ठ नेते बैठकांवर बैठका करत होते. त्यातच संसदेचं अधिवेशन सुरू असल्याने शरद पवारही दिल्लीतच होते. त्यामुळे सर्व घडामोडी दिल्लीतच केंद्रीत झाल्या होत्या. या बैठकांमध्ये काँग्रेसने शिवसेनेसोबत जाण्यास मान्यता दिली आणि सत्तेचा नवा फॉर्म्युलाही तयार झाला. आता चर्चेच्या फेऱ्या या शिवसेनेसोबत होणार असल्याने उद्यापासून (शुक्रवार 22 नोव्हेंबर) सगळी चर्चा मुंबईत होणार आहे.

काँग्रेसने आपल्या वाट्याला येणाऱ्या 11 मंत्र्यांचाही निर्णय घेतला आहे. संभाव्य मंत्र्यांची यादीही तयार करण्यात आलीय. नेत्यांना तातडीने मुंबईत जाता यावं यासाठी काँग्रेसने एक चार्टड विमानही बुक केलं असून ते दिल्ली विमानतळावर तयार ठेवण्यात आलंय. हे विमान नेत्यांना मुंबईत जाण्यासाठी वापरलं जाण्याची शक्यता आहे.

लोकसभेत शिवसेनेनं केली स्वा. सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी

उद्या मुंबईत अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या आमदारांची मातोश्रीवर बैठक बोलावलीय. त्यात उद्धव ठाकरे हे आमदारांना महत्त्वाचा संदेश देणार आहेत. काँग्रेसने अद्याप आपला गटनेताच निवडला नसून उद्या आमदारांची बैठक होणार आहे त्यात नव्या नेत्याची निवड केली जाणार आहे.

त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांची संयुक्त बैठक होणार असून त्यात सत्तावाटपाच्या फॉर्म्युल्याला अंतिम रुप दिलं जाणार आहे. काँग्रेस थेट शिवसेनेला पाठिंब्याचं पत्र देणार नाही तर काँग्रेस राष्ट्रवादीला पाठिंब्याचं पत्र देणार आहे. दोनही पक्ष नव्याने पत्र तयार करून त्यावर आमदारांच्या सह्या घेणार आहे.

Loading...

नवा फॉर्म्युला तयार

सत्तेचा पेच सोडविण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली चर्चा आणि निर्णायक टप्प्यावर आलीय. सरकार स्थापनेच्या फॉर्म्युल्यावर काँग्रेस कार्यकारिणीत शिक्कामोर्तब झालंय. महाविकासआघाडी असं नव्या आघाडीचं नाव असणार आहे. महाशिवआघाडी हे नाव सेनेनं सुचवलेलं होतं पण काँग्रसने सेनेचा हा प्रस्ताव मान्य केला नाही अशी माहिती सूत्रांनी दिलीय. किमान समान कार्यक्रमावरही तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. तर समन्वयासाठी समन्वय समितीची स्थापना केली जाणार असल्याचीही माहिती पुढे आलीय.

'रड्या ऑफ द ईयर अवार्ड संज्यालाच दिला पाहिजे'

काँग्रेसला विधानसभा अध्यक्षपद आणि उपमुख्यमंत्रिपद मिळणार आहे. काँग्रेस थेट शिवसेनाला पाठिंबा देणार नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंब्याचे पत्र देणार आहे. सत्तेचा नवा फॉर्म्युला आता तयार झाला असून 11-11-11 या सूत्रानुसार सत्तेचं वाटप होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: mumbai
First Published: Nov 21, 2019 04:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com