मराठी बातम्या /बातम्या /देश /

Twitter Vs Modi Government: नव्या IT मंत्र्यांचा पहिल्याच दिवशी Twitter ला गंभीर इशारा, म्हणाले...

Twitter Vs Modi Government: नव्या IT मंत्र्यांचा पहिल्याच दिवशी Twitter ला गंभीर इशारा, म्हणाले...

नवे आयटी मंत्री अश्विनी वैष्णव (IT Minster Ashwini Vaishnav) यांनी गुरुवारी या खात्याचा पदभार स्वीकारला. हा पदभार स्वीकारताच त्यांनी सोशल मीडिया (Social Media) कंपन्यांना त्यांच्या मनमानी कारभाराबद्दल इशारा दिला आहे.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 8 जुलै: नवे आयटी मंत्री अश्विनी वैष्णव (IT Minster Ashwini Vaishnav) यांनी गुरुवारी या खात्याचा पदभार स्वीकारला. हा पदभार स्वीकारताच त्यांनी सोशल मीडिया (Social Media) कंपन्यांना त्यांच्या मनमानी कारभाराबद्दल इशारा दिला आहे. 'देशाचा कायदा हा सर्वोच्च आहे. ट्विटरनं (Twitter) या कायद्याचं पालन केलं पाहिजे,' असा इशारा वैष्णव यांनी दिला आहे.

तक्रार निवारण अधिकारी स्थापन करण्यासाठी आठ आठवड्यांची मुदत देण्याची मागणी ट्विटरनं दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) केली आहे. या मागणीनंतर काही तासांमध्ये वैष्णव यांनी हा इशारा दिला आहे. 'आयटी नियमांचे पालन करण्यासाठी भारतामध्ये संपर्क कार्यालय स्थापन करण्याची प्रक्रिया कंपनीनं सुरू केली आहे. हे कंपनीचे स्थायी कार्यालय असेल,' असे ट्विटरने न्यायालयात स्पष्ट केले.

यापूर्वी या प्रकरणावर मंगळवारी झालेल्या सुनावणीत स्थानिक तक्रार अधिकाऱ्याची नियुक्ती कधी करणार? याचे उत्तर गुरुवारपर्यंत (8 जुलै) देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते.

Delhi Riots: Facebook च्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

कोण आहेत वैष्णव?

नवे आयटीमंत्री अश्विनी वैष्णव यांची खासदार म्हणून ही पहिलीच टर्म आहे. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांच्याकडे इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी, संचार आणि रेल्वे मंत्रलायची जबाबदारी देण्यात आली आहे. "देशाची सेवा करण्याची सर्वोत्तम संधी दिल्लाबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आभारी आहे. दूरसंचार, आयटी आणि रेल्वे या तीन खात्यांमध्ये उत्तम ताळमेळ आहे. या खात्याचे व्हिजन पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन.'' अशी प्रतिक्रिया पदभार स्वीकारल्यानंतर वैष्णव यांनी दिली.

वैष्णव यांनी ज्येष्ठ भाजपा नेते तसंच मावळते आयटी आणि संचार मंत्री रवीशंकर प्रसाद यांची जागा घेतली आहे. विशेष म्हणजे प्रसाद यांनी याच मुद्द्यावर यापूर्वी ट्विटरवर टीका केली होती.

First published:

Tags: Modi government, Social media, Twitter