पंतप्रधान मोदी असुरक्षित हुकूमशहा; राहुल गांधींचा हल्लाबोल

पंतप्रधान मोदी असुरक्षित हुकूमशहा; राहुल गांधींचा हल्लाबोल

गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी यांची मोदींवरची टीकेची धार वाढली आहे. राफेल प्रकरणावरूनही त्यांनी मोदींना चोर पंतप्रधान असं म्हटलं होतं.

  • Share this:

नवी दिल्ली 21 डिसेंबर : काँग्रेसाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरचा आक्रमक हल्ल्यांचा रोख कायम ठेवला आहे. नव्या आयटी अॅक्टवरून सरकारवर टीकेची झोड उठली असतानाच राहुल गांधींनी ट्विटकरून मोदींवर थेट टीका केलीय. राहुल गांधी म्हणाले, मोदींना देशात पोलिसांचं राज्य आणायचं आहे. असे निर्णय घेऊन तुमचे प्रश्न संपणार असं तुम्हाला वाटतं का? यातून काहीही साध्य होणार नसून तुम्ही एक असुरक्षीत हुकूमशहा आहात हेच सिद्ध होईल अशी कडक टीकाही त्यांनी केली.

गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी यांची मोदींवरची टीकेची धार वाढली आहे. राफेल प्रकरणावरूनही त्यांनी मोदींना चोर पंतप्रधान असं म्हटलं होतं.

काय आहे हा नवा कायदा?

केंद्र सरकारनं तमाम नागरिकांवर हेरगिरी करण्याचा अधिकारच 10 सरकारी यंत्रणांना दिला आहे. कोणत्याही नागरिकाचा फोन कॉल टॅप करणं, फोनमधील इतर डेटा आणि कॉम्प्युटरमधील माहिती गोळा करणं हे आता सरकारी यंत्रणांना सहज शक्य होणार आहे. यासाठी आधी केंद्रीय गृह खात्याची लेखी परवानगी लागायची, पण आता त्याची गरज लागणार नाहीये.

पण या सगळ्यावरून पक्षांमध्ये मोठा वाद पेटला आहे. हा व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला आहे, असा आक्षेप अनेक तज्ज्ञ आणि सामान्य नागरिकांनी घेतला आहे. दहशतवादी कारवाया आणि इतर गंभीर गुन्ह्यांना आळा घालणं, हा या मागचा जाहीर हेतू असला तरी त्यासाठी गोपनीयतेचा किती भंग करायचा, यालाही मर्यादा असायला हव्या, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार, देशातील 10 सुरक्षा यंत्रणा नागरिकांच्या कंप्युटरमधील कोणताही डेटा पाहू शकते. दरम्यान, सरकारच्या या निर्णयाला काँग्रेस, समाजवादी पार्टी, आरजेडी आणि एमआयएमनं कडाडून विरोध केला आहे. प्रत्येक नागरिकावर नजर ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी केला आहे.

काँग्रेस नेते पी चिदंबरम म्हणाले की, 'या प्रकरणातली संपूर्ण माहिती आमच्याकडे नाही. पण जर आपल्या कंप्युटरवर कोणी नजर ठेवणार असेल तर आपण ऑरवेलियन स्टेटकडे जात आहोत.' खरं तर, जॉर्ज ऑरवेलियनने एक पुस्तक लिहिलं होतं ज्याचं नाव '1984' होतं.या पुस्तकात नागरिकांना व्यक्तिस्वातंत्र्य देण्यात आलं नव्हतं. तर सरकार प्रत्येकावर नजर ठेवतं असं या पुस्तकात नमूद करण्यात आलं होतं.

त्याचबरोबर एमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. 'हर-हर मोदी, घर-घर मोदी' याचा अर्थ काय हे आता समजलं असं ओवेसी म्हणाले आहेत.

या यंत्रणांना देण्यात आले फोन टॅपींगचे अधिकार

- गुप्तचर खातं

- अंमली पदार्थ प्रतिबंधक विभाग

- अंमलबजावणी संचालनालय

- केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड

- महसूल गुप्तचर संचालनालय

- सीबीआय

- एनआयए

- रिसर्च अँड अनॅलिसीस विंग (रॉ)

- सिग्नल इंटेलिजन्स संचालनालय

- पोलीस आयुक्त, दिल्ली

First published: December 21, 2018, 9:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading