दिल्ली, 08 जून : पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मूसेवाला (Punjabi Singer Sidhu Moosewala) हत्या प्रकरणात पुणे ग्रामीण कनेक्शन समोर आले होते. अखेरीस या प्रकरणात सौरभ महाकाळ या पुणे पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. याच प्रकारणाला एक नवे वळण मिळाले आहे. अटक करण्यात आलेल्या पुण्यातील सौरभ महाकालबाबत (Saurabh Mahakal) धक्कादायक माहिती समोर आली आहे.
काय आहे नवीन माहिती -
स्पेशल सेलचे विशेष आयुक्त एचजीएस धालीवाल यांनी याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले की, दिल्ली पोलिसांचे विशेष पथक यापूर्वीच अनेक गुंडांचा शोध घेत आहे. तसेच पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची हत्या करण्यात आल्यानंतर या प्रकरणाचाही तपास करत आहे. यासाठी आमचे पथक आठ संशयित आरोपींची चौकशी करत आहे.
आमच्या पथकाने तपासादरम्यान पाच आरोपींना ओळखले. यातील एक आरोपी सितेश हिरामण कमळे उर्फ ‘महाकाल’ याला संयुक्त कारवाईत पुण्यातून अटक करण्यात आली आहे. तसेच आमची टीम सध्या पुण्यात संयुक्तपणे आरोपींची चौकशी करत आहे. आरोपी महाकाल याचा खुनात सहभाग नव्हता. मात्र, खून करणाऱ्या शूटरशी त्याचे अतिशय जवळचे संबंध होते. दोघेही अनेक गुन्ह्यांमध्ये सामील होते. तसेच त्यांनी एकत्र अनेक खून केले आहेत.
स्पेशल सेलचे विशेष आयुक्त एचजीएस धालीवाल यांनी पुढे सांगितले की, अभिनेता सलमान खानशी संबंधित धमकी पत्र प्रकरणी मुंबई पोलीस तपास करत आहेत. आम्ही गँगस्टर लॉरेन्स विश्नोईची सतत चौकशी करत आहोत, असेही त्यांनी सांगितले.
नेमकं काय घडलं होतं?
पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मूसेवाला यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. मानसा येथे सिद्धू यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या घटनेत सिद्धुचा दुर्दैवी मृत्यू झाला. पंजाबमधील भगवंत मान सरकारने ४२४ महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय नुकताच घेतला. सुरक्षा काढून घेतलेल्या महत्त्वाच्या व्यक्तींमध्ये सिद्धू मुसेवाला यांचाही सामावेश होता. सुरक्षा काढून घेतल्याचा ठीक एका दिवसानंतर ही घटना घडली होती.
हेही वाचा - सिद्धू मुसेवाला आता आमच्या शरीराचाच एक भाग, भावनिक चाहत्यांची अनोखी श्रद्धांजली
मुसेवाला यांच्या एकूण 23 जखमा होत्या असं शवविच्छेदन अहवालातून समोर आलं होतं. 14 ते 15 गोळ्या मुसेवालांच्या शरीरातून आरपार गेल्या होत्या. या हल्ल्यात मुसेवालाच्या शरीरवर तब्बल तीन ते पाच सेंटीमीटर पर्यंतच्या खोल जखमा दिसून आल्या होत्या. सध्या पंजाब पोलीस हा हत्येप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.