Home /News /national /

मोठी बातमी! कुटुंबीयांसोबत मित्रांचाही आरोग्य विम्यामधील सहभाग शक्य, कशी असेल प्रक्रिया

मोठी बातमी! कुटुंबीयांसोबत मित्रांचाही आरोग्य विम्यामधील सहभाग शक्य, कशी असेल प्रक्रिया

अशा स्वरुपाच्या आरोग्य विम्यात 5 ते 30 जणांना सहभागी करता येऊ शकते

    नवी दिल्ली, 27 जानेवारी :  आरोग्य विमा हा जीवनातील महत्त्वाचा भाग होत चालला आहे. अचानक आरोग्याच्या समस्या उद्भवल्यास आरोग्य विम्याचा मोठा आधार असतो. मात्र अनेक कंपन्यांकडून ग्राहकांची फसवणूकही केली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा व विश्वासार्हता जपलेल्या कंपन्यांकडून आरोग्य विमा काढून घेणे केव्हाही फायद्याचे असते. कंपन्यांकडूनही नव्याने विविध सूट दिल्या जात आहेत. आतापर्य़ंत विम्यात कुटुंबातील सदस्यांचा सहभाग केला जात होता. त्यातही 4 ते 5 जणांची मर्यादा असल्याने आई-वडिलांबरोबरच सासू-सासऱ्यांचा सहभाग करता येत नव्हता. मात्र ही गरज लक्षात घेऊन विमा कंपन्यांनी नियमांमध्ये बदल केला असून कुटुंबातील सदस्यांबरोबरच मित्रांचाही विमा पाॅलिसीत सहभाग करता येणार आहे. आरोग्य विमा पॉलिसीत आता आपल्या कुटुंबातील सदस्यांबरोबर मित्रांचाही सहभाग करू शकता. मीडिया रिपोर्टनुसार अशा स्वरुपाच्या आरोग्य विम्यात 5 ते 30 जणांना सहभागी करता येणार आहे. डॉक्टरांची किती वेळा भेट घेतली, किती वेळा हेल्थ चेकअप केला अशा स्वरुपाच्या सुविधा या पॉलिसीमध्ये देण्यात येणार आहे. या आधारावर ग्रुपचा स्कोर तयार करण्यात येईल. या स्कोरच्या आधारावर ग्रुपचे प्रीमियम ठरविण्यात येईल. रेलिगेयर हेल्थ इंन्शोरेन्स, मैक्स बूपा हेल्थ इंन्शोरेन्स आणि कोटक महिंद्रा जनरल इंन्शोरेन्स आदींकडून 'Friend Assurance' पॉलिसीचा नवा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रातील बातमीनुसार इंन्शोरेन्स रेग्युलेटर IRDAI ने याला मंजुरी दिली आहे. या पॉलिसीचा पायलट प्रोजेक्ट 1 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. फ्रेंड इंन्शोरेन्सचा हा नवीन प्रस्ताव युरोपीय देशांमध्ये होणाऱ्या पॉलिसींपेक्षा वेगळा आहे. युरोपातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था जर्मनीसारख्या देशांमध्ये नियमांपेक्षा या प्रस्तावित पॉलिसी वेगळ्या आहेत. पायलट प्रोजेक्ट म्हणून पॉलिसीची सुरुवात सहा महिन्यांसाठी कंपन्या ही पॉलिसी पायलट प्रोजेक्टच्या धर्तीवर सुरू करत आहे. रेलिगेयर हेल्थ इंन्शोरेन्सकडून सांगण्यात आले आहे की जर पूर्ण वर्षात कोणता क्लेम केला नाही तर पुढल्य़ा प्रीमियमवर 15 टक्क्यांची सूट दिली जाईल. तर मैक्स बूपाकडून सांगण्यात आले आहे की जर कोणत्याही ग्रुपचा स्कोर चांगला असेल तर त्याला 5 ते 10 टक्क्यांची सूट मिळेल.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या