Home /News /national /

पावसाच्या विध्वंसाचा पहिला Video; ट्रेनही पावसाच्या प्रवाहासोबत गेली वाहून 

पावसाच्या विध्वंसाचा पहिला Video; ट्रेनही पावसाच्या प्रवाहासोबत गेली वाहून 

हा भयंकर व्हिडीओ पाहून तेथील परिस्थितीचा अंदाज येईल.

    गुवाहाटी, 16 मे : आसाममध्ये (Assam News) पावसाने रौद्र रूप धारण केलं आहे. अनेक गावांमध्ये पुराबरोबरच भूस्खलनाच्या घटनाही समोर आल्या आहेत. या पुरामुळे आसाममधील तब्बल 57,000 स्थानिकांना याचा फटका सहन करावा लागत आहे. आतापर्यंत या पुरामुळे पाच जणांचा मृत्यू झाल्याचंही समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिमा हासाओ जिल्ह्यातील हाफलाँग रेल्वे स्टेशनवर पाणी जमा झालं आहे. येथील संपूर्ण रेल्वे ट्रॅकवर पाणी जमा झालं असून रेल्वेही अडकली आहे. भूस्खलन आणि पुरामुळे अडकलेली रिकामी पॅसेंजर ट्रेन दिमा हासाओच्या न्यू हाफलाँग स्टेशनवरच टेकड्यांवरुन वाहणारं पाणी आणि चिखलामुळे रुळावरून घसरली. व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, पाण्याच्या प्रवाहामुळे रेल्वेचे डबे पलटले. यावरुन पावसाच्या रौद्र रुपाचा अंदाज बांधू शकतो. पाण्याच्या प्रवाहामुळे अक्षरश: रेल्वेचे डबे लोटले जात असताना दिसत आहे. त्याशिवाय टेकड्यांवरुन येणाऱ्या चिखल आणि गाळामुळे रेल्वे स्थानकाची परिस्थिती भयंकर झाली आहे. रेल्वे अडकल्यानंतर सुदैवाने आधीच प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं. IAF Chopper च्या माध्यमातून प्रवाशांनी तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं. वेळीच त्यांना मदतकार्य मिळाल्यामुळे प्रवाशांचे जीव वाचले आहेत. या आपत्तीचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये रेल्वे पुराच्या पाण्यात अडकल्याचं दिसत आहे. बातमी येईपर्यंत तब्बल 35 प्रवाशी मदतीच्या प्रतीक्षेत असल्याचं सांगण्यात आलं. मान्सूनपूर्वी आसाममध्ये (Assam Flood) पुरामुळे नागरिकांची हालत गंभीर झाली आहे. पुरामुळे तब्बल 222 गावांना याचा फटका सहन करावा लागत आहे. पुरामुळे एका लहान मुलासह तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकोपामुळे 202 घरांचं नुकसान झालं आहे. या राज्यात साधारण 18 मेपर्यंत अलर्ट जारी करण्यात आलं आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Assam, Rain flood, Shocking news

    पुढील बातम्या