Home /News /national /

मोठी बातमी: बाईक चालविणाऱ्यांसाठी नवे नियम, जाणून घ्या 5 महत्त्वाच्या गोष्टी

मोठी बातमी: बाईक चालविणाऱ्यांसाठी नवे नियम, जाणून घ्या 5 महत्त्वाच्या गोष्टी

सार्वजनिक वाहतूक सेवेत असणाऱ्यांना कोरोनाचा धोका असतो. शिवाय यातून प्रवास करणाऱ्यांसाठीही हे जिकरीचं काम आहे. अशातच रिक्षा चालकाच्या मागे एक सुरक्षित पार्टिशन लावल्यास हा धोका टाळता येऊ शकतो. ऊबेर आणि बजाज ऑटो हे देशातील 1 लाख रिक्षाचालकांच्या वाहनात हे पार्टिशन बसवणार आहेत. या दोन कंपन्यांनी यासंदर्भात एकत्रितपणे हा उपक्रम सुरू केला आहे.

सार्वजनिक वाहतूक सेवेत असणाऱ्यांना कोरोनाचा धोका असतो. शिवाय यातून प्रवास करणाऱ्यांसाठीही हे जिकरीचं काम आहे. अशातच रिक्षा चालकाच्या मागे एक सुरक्षित पार्टिशन लावल्यास हा धोका टाळता येऊ शकतो. ऊबेर आणि बजाज ऑटो हे देशातील 1 लाख रिक्षाचालकांच्या वाहनात हे पार्टिशन बसवणार आहेत. या दोन कंपन्यांनी यासंदर्भात एकत्रितपणे हा उपक्रम सुरू केला आहे.

बाईकच्या मागच्या चाकाचा अर्धा भाग हा कव्हर केलेला असावा. त्यामुळे मागे बसणाऱ्याचे कपडे त्यात जाणार नाहीत.

    नवी दिल्ली 24 जुलै: भारतातलं अपघाताचं प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने नवे नियम केले आहेत. तर काही नियमांमध्ये बदल केले आहेत. रस्ता (Road Safety) सुरक्षेसाठी या गोष्टींचं पालन सगळ्यांनी करावं असं आवाहनही करण्यात आलं आहे. बाईक चालविणाऱ्यांसाठी आणि मागे बसणाऱ्यांसाठी हे नवे नियम असणार आहेत. (New Guidelines for two wheeler) रस्ते वाहतून मंत्रालयाने केलेल्या नव्या नियमानुसार बाईकवर मागे बसणाऱ्यांसाठी दोन्ही बाजूला हँड होल्डर असणे गरजेचं आहे. सध्या बहुतेक गाड्यांना अशी सुविधा नसते. त्याच बरोबर दोन्ही बाजून फुटरेस्ट असणेही सक्तीचं करण्यात आलं आहे. बाईकच्या मागच्या चाकाचा अर्धा भाग हा कव्हर केलेला असावा. त्यामुळे मागे बसणाऱ्याचे कपडे त्यात जाणार नाहीत. अनेक अपघात याच गोष्टींमुळे होतात. बाईकवर आता मागे कंटेनरही लावता येणार आहे. त्याची लांबी 550 MM तर रुंदी 510 MM आणि उंची 500 MM पेक्षा  जास्त नसावी. अशा प्रकारचं कंटेनर असेल तर मागे बसण्याला परवानगी नाही. त्याचबरोबर 3.5 टन वजनाच्या वाहनांसाठी टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम बसविण्याची सूचनाही सरकारने दिली आहे. ही सिस्टिम लावली तर ड्रायव्हरला गाडीच्या हवेची स्थिती योग्य आहे की नाही याची माहिती मिळणार आहे. सर्व बाईक निर्मात्या कंपन्यांना या नियमांचं पालन नव्या गाड्या तयार करतांना करावं  लागणार आहे. WhatsApp देणार ही नवी सुविधा! वेगवेगळ्या फोनमध्ये वापरता येणार एकच नंबर दरम्यान,  इलेक्ट्रिक कार (Electric Car) ची विक्री आणि उत्पादन आणखी वाढावे, यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहे. त्यामुळेच इलेक्ट्रिक आता इलेक्ट्रिक वाहनांना आता एक वेगळी ओळख मिळणार आहे. त्याच बरोबर बीएस-6 वाहनांसाठी नंबर प्लेटवर नवीन रंग आणि स्टिकर असणार आहे. 7 वर्षांची प्रतिक्षा संपली, लवकरच येतेय 7 सीटर Maruti Suzuki Wagon R! आता यापुढे इलेक्ट्रिक गाड्यांची नंबर प्लेटही वेगळ्या रंगाची असणार आहे. या गाड्यांची नंबर प्लेट (Car Number Green Plate ) हिरव्या रंगात असणार आहे. याबद्दल केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की, 'ज्या गाड्या या बॅटरीवर चालणाऱ्या आहे. त्या गाड्यांची वेगळी ओळख असावी यासाठी त्यांच्या नंबर प्लेट या हिरव्या रंगात असणार आहे आणि त्यावर पिवळ्या रंगाची अक्षर असावी.'
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    पुढील बातम्या