Elec-widget

भाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार?

भाजपला शह, जम्मू आणि काश्मीरात येणार नवं सरकार?

मेहबुबा मुफ्ती यांच्या पीडीपीने राज्यपाल सत्यपाल मलिक यांना पत्र लिहून 56 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केलाय.

  • Share this:

श्रीनगर,ता. 21 नोव्हेंबर : जम्मू आणि काश्मीरमध्ये बर्फ वर्षावाला सुरूवात झाल्यानं वातावरण कमालीचं थंड आहे. अशा थंड वातावरणात राजकीय पातळीवर मात्र जोरदार हालचाली सुरू असल्यानं  वातावरण उबदार बनलंय. राज्यपाल राजवट असलेल्या जम्मू आणि काश्मीरमध्ये पीडीपी आणि काँग्रेस एकत्र येऊन सरकार स्थापन करणार आहेत. आणि ओमर अब्दुल्ला यांचा नॅशनल कॉन्फरन्स बाहेरून पाठिंबा देणार आहे. मेहबुबा मुफ्ती यांच्या पीडीपीने राज्यपाल सत्यपाल मलिक यांना पत्र लिहून 56 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केलाय. राज्यपाल आता कुठला निर्णय घेतात याकडे सगळ्यांच लक्ष लागलंय.


भाजपने पीडीपीचा पाठिंबा काढल्यानंतर मेहेबुबा मुफ्ती यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हापासून विधानसभा स्थगित ठेवण्यात आली आहे. या आधी भाजपने पीडीपीचे काही असंतुष्ट आमदार गळाला लागतात का याची चाचपणी केली होती. असा प्रयत्न करून सत्ता स्थापन करण्याची भाजपची योजना होती मात्र ती यशस्वी झाली नाही.


नंतरच्या काळात काँग्रेस आणि पीडीपी जवळ आल्यानं सत्तेचं नवं समिकरण तयार झालं. पण विधानसभा बरखास्त करण्याचे आदेश केंद्र सरकारकडून राज्यपालांना जाऊ शकतात, याची शक्यताही नाकारता येत नाही.

Loading...


असं हे संख्याबळ


 बहुमताचा आकडा - 44


पीडीपी - 28

 काँग्रेस - 12

 एनसी - 15

........................................

 एकूण - 55



 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 21, 2018 08:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...