70 कोटीचं घर आणि 8 लाखाचं जॅकेट, नीरव मोदी लंडनमध्ये जगतोय Luxury Life

70 कोटीचं घर आणि 8 लाखाचं जॅकेट, नीरव मोदी लंडनमध्ये जगतोय Luxury Life

नीरव मोदी लंडनमध्ये अलिशान आयुष्य जगत आहे. त्याचा एक व्हिडीओ देखील आता समोर आला आहे.

  • Share this:

लंडन, 9 मार्च : पंजाब नॅशनल बँकेला तब्बल 13 हजार कोटींचा चुना लावून परदेशी फरार झालेला डायमंड व्यापारी नीरव मोदी सध्या लंडनमध्ये मजा करतोय आणि राजेशाही आयुष्य जगतोय. भारतातून पळालेल्या नीरव मोदीनं लंडनमध्ये आश्रय घेतला आहे. तिथे त्यानं 70 कोटींचं घर घेतलं असून 8 लाखाचं जॅकेट घालून नीरव मोदी रस्त्यावरून फिरताना दिसतोय. द टेलिग्राफच्या पत्रकारानं नीरव मोदीचा व्हिडीओ शूट केला आहे. यावेळी पत्रकारानं नीरव मोदीनं ब्रिटन सरकारकडे आश्रयासाठी अर्ज केला आहे का? असा सवाल केला. त्यावर काहीही बोलण्यास नीरव मोदीनं नकार दिला. केवळ 'सॉरी' म्हणून तो निघून गेला.

दुसरीकडे सोहोमध्ये नीरव मोदीनं डायमंडचा व्यापार देखील पुन्हा सुरू केला आहे. टेलिग्राफमध्ये आलेल्या रिपोर्टनुसार नीरव मोदी घर ते ऑफिस कुत्र्यासोबत चालत जातो. त्यानं आपला लूक देखील बदलला असून दाढी आणि मिशी वाढवली आहे. 2018मध्ये नीरव मोदीनं कंपनी रजिस्टर केली असून त्यामध्ये नीरव स्वत: डायरेक्टर आहे.

भाजपच्या बैठकीत ठरला मोदींसाठी मतदारसंघ, निवडणूक जिंकण्यासाठी 'हा' आहे मास्टरप्लॅन

चोराच्या उलट्या बोंबा

पीएनबी बँकेतील घोटाळा समोर आल्यानंतर नीरव मोदीनं घोटाळा करून मी फरार झालो नाही अशी उलट्या बोंबा मारल्या होत्या. शिवाय, आता बदनामी जाली असून कर्ज फेडण्यासाठी अडचणी येतील असं म्हटलं होतं. दरम्यान, नीरव मोदीला भारतात आणण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं सरकारनं म्हटलं आहे.

पैशांची वसुली करण्यासाठी यापूर्वी ईडीनं नीरव मोदीच्या काही मालमत्ता देखील जप्त केल्या आहेत.

अलिबागमधील बंगला पाडला

पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटींचा चुना लावून परदेशात फरार झालेल्या नीरव मोदीचा अलिबागमधील बंगला शुक्रवारी जिल्हा प्रशासनानं स्फोटकं लावून पाडला. सीआरझेडचे नियम धाब्यावर बसवून मोदीनं हा अलिशान बंगला बांधला होता. मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हा कोट्यवधीचा बंगल्याचा भूईसपाट करण्यात आला. 100 कोटी एवढी या बंगल्याची किंमत होती.

Special Report : 100 कोटींचा बंगला 110 डायनामाईटने असा केला उध्वस्त

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 9, 2019 11:07 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading