मराठी बातम्या /बातम्या /देश /

राजधानी दिल्ली प्रदूषणामुळे 'या' गोष्टींवर निर्बंध, पुढच्या आदेशापर्यंत शाळा- कॉलेज बंद

राजधानी दिल्ली प्रदूषणामुळे 'या' गोष्टींवर निर्बंध, पुढच्या आदेशापर्यंत शाळा- कॉलेज बंद

गौतम बुद्ध नगरच्या डीएमनं 21 नोव्हेंबरपर्यंत गौतम बुद्ध नगरमधील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिलेत.

गौतम बुद्ध नगरच्या डीएमनं 21 नोव्हेंबरपर्यंत गौतम बुद्ध नगरमधील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिलेत.

गौतम बुद्ध नगरच्या डीएमनं 21 नोव्हेंबरपर्यंत गौतम बुद्ध नगरमधील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिलेत.

  • Published by:  Pooja Vichare

नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर: दिल्ली-एनसीआरमध्ये (Delhi-NCR) प्रदूषणाची स्थिती (Pollution Situation) गंभीर होत चालली आहे. राजधानी दिल्लीनंतर (Delhi) आता उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) गौतम बुद्ध नगर (Gautam Buddha Nagar) आणि मुझफ्फरनगरमधील (Muzaffarnagar) शाळा (Schools) आणि महाविद्यालये (Colleges) बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गौतम बुद्ध नगरच्या डीएमनं 21 नोव्हेंबरपर्यंत गौतम बुद्ध नगरमधील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिलेत. सर्व कार्यालये 50 टक्के कर्मचाऱ्यांसह सुरू असतील. येथे गुरुग्रामसह दिल्ली-एनसीआरमधील सर्व भागात शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यास सांगण्यात आलं आहे.

गौतम बुद्ध नगरमध्ये शाळा-कॉलेज बंद

यापूर्वी दिल्लीतही आठवडाभर शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. तेथेही प्रदूषणाची स्थिती अत्यंत गंभीर आहे. यानंतर हरियाणातील एनसीआर भागात शाळा बंद करण्याची घोषणा करण्यात आली आणि आता गौतम बुद्ध नगरमध्येही तीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. बुधवारी गौतम बुद्ध नगरचे DM सुहास एलवाय यांनी माध्यमांशी बोलताना या निर्णयासंदर्भातली माहिती दिली.

हेही वाचा- Hats Off! फक्त एका तासात 5 दहशतवाद्यांचा खात्मा, सुरक्षा दलाला मोठं यश

या निर्णयानुसार सर्व खासगी आणि सरकारी शाळांसह इतर शैक्षणिक संस्था बंद राहणार आहेत. सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारांना फटकारल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. न्यायालयानं बुधवारी संध्याकाळची मुदत आधीच दिली होती. प्रदूषणाबाबत ठोस निर्णय घ्यावा, असं सांगण्यात आलं होतं. याच भागात गौतम बुद्ध नगरमध्ये शाळा आणि महाविद्यालये बंद राहणार आहेत. तसंच पालकही सातत्यानं तशी मागणी करत होते. अशा प्रदूषणात मुलांना शाळेत पाठवण्यासही ते योग्य नव्हतं.

गुरुग्राम- NCR मध्येही शाळा बंद

गुरुग्रामसह NCRमधील सर्व सरकारी आणि खाजगी शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्था पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याचंही वृत्त आहे. गुरुग्रामचे उपायुक्त डॉ यश गर्ग यांनी सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांना दिल्ली एनसीआर आणि लगतच्या भागात हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाच्या सूचनांचे पालन करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. केवळ गॅस कनेक्टिव्हिटी असलेल्या उद्योगांना गॅसवर चालविण्यास परवानगी असेल, तर उद्योगांमध्ये अनधिकृत इंधन वापरण्यास मनाई असेल, असे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा-  IND vs NZ : विराट-शास्त्रीच्या जमान्यात संपलंच होतं करियर, रोहितने या खेळाडूला दिली 'संजिवनी'

 सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर मुख्यमंत्री खट्टर यांनीही मोठे निर्णय घेतले आहेत. राज्यभरातील औष्णिक वीज युनिटमध्ये होणारे उत्पादन बंद करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय धोकादायक प्रदूषण पातळीवर गुरुग्राम जिल्हा प्रशासनाच्या सर्व अधिकाऱ्यांची एक समिती स्थापन करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

दिल्लीत ट्रक प्रवेशावर बंदी

दरम्यान बुधवारी दिल्लीतील हवेची गुणवत्ता पूर्वीपेक्षा थोडी चांगली होती. आकडेवारीनुसार, राजधानीत 375 चा AQI नोंदविला गेला, जो पूर्वी 400 च्या पुढे होता. मात्र रविवारपर्यंत दिल्लीला प्रदूषणापासून दिलासा मिळणार नसल्याचे बोलले जात आहे. या कारणास्तव दिल्लीत 25 नोव्हेंबरपर्यंत ट्रकच्या प्रवेशावरही बंदी घालण्यात आली आहे. अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करणारे ट्रक वगळता अन्य कोणत्याही अवजड वाहनांना राजधानीत प्रवेश मिळणार नाही, असे सांगण्यात आले आहे.

First published:

Tags: Air pollution, Delhi