पुन्हा रचणार इतिहास, भाजपला मिळणार पूर्ण बहुमत - पंतप्रधान मोदींना विश्वास

पुन्हा रचणार इतिहास, भाजपला मिळणार पूर्ण बहुमत - पंतप्रधान मोदींना विश्वास

लोकसभा निवडणूक 2019मधील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी भाजप मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 मे : लोकसभा निवडणूक 2019मधील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी भाजप मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. महत्त्वाचे म्हणजे यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील हजर होते. एनडीएची सत्ता स्थापन झाल्यापासून पाच वर्षात पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी पत्रकार परिषदेत अमित शहांसोबत उपस्थित राहिले होते.

पंतप्रधान मोदींचा विरोधकांना टोला

पत्रकार परिषदेदरम्यान 2014 मधील लोकसभा निवडणुकांचा उल्लेख करत पंतप्रधान मोदींनी म्हटलं की, 'लोकसभा निवडणूक 2014चे निकाल 16 मे रोजी आले होते, यानंतर 17 मे रोजी मोदी सरकार सत्तेत येताच भ्रष्टाचाऱ्यांना मोठी किंमत चुकवावी लागली होती. यावेळेस सट्टेबाजांचं मोठं नुकसान झालं होतं. त्यावेळी काँग्रेसच्या 150 जागांसाठी आणि भाजपच्या 218 जागांसाठी सट्टा लागला होता. पण मी शपथ घेण्याआधीच सर्वांचं कोट्यवधींचं नुकसान झालं आणि 17 मेपासून ईमानदारीची सुरुवात झाली', असं म्हणत मोदींनी विरोधकांना टोला लगावला.

'नवं सरकार लवकरच कामाला लागेल'

'आम्ही संकल्प पत्रात देशाला पुढे घेऊन जाण्याचं आश्वासन दिलं होतं. जितक्या लवकर शक्य आहे तितक्या लवकर नवीन सरकार कामाला लागेल. एकापाठोपाठ एक लगेचच आम्ही निर्णय घेऊ',असंही यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले.

देशवासीयांचे मानले आभार

'5 वर्ष देशवासीयांनी मला जो आशीर्वाद दिला त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो. यादरम्यान अनेक चढउतार आले, पण देश माझ्यासोबत कायम होता',

असं म्हणत पंतप्रधान मोदींनी देशवासीयांचे आभार मानले.

पाहा : VIDEO: मोदी का म्हणाले 5 वर्षांआधी याच दिवशी झालं होतं सट्टेबाजांचं कोट्यवधीचं नुकसान?

'पुन्हा मोदींचेच सरकार'

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा म्हणाले की,' गेल्या पाच वर्षात 50 कोटी गरिबांचं जीवन सुधारण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसंच देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदींचेच सरकार येईल. नरेंद्र मोदी प्रयोगाला जनतेनं स्वीकारलं, पुन्हा मोदी सरकारच येणार आहे. लोकांच्या मनात सुरक्षेबाबत कोणतीही चिंता नाही. भाजप संघटनात्मक आधारावर काम करणार पक्ष आहे. आम्ही प्रत्येक क्षेत्रात आम्ही विकास केला आहे.

पश्चिम बंगाल हिंसाचाराबाबत शहा म्हणाले...

कोलकातामध्ये रोड शोदरम्यान झालेल्या हिंसाचाराबाबत अमित शहा म्हणाले की, 'बंगालमध्ये माझे 80 कार्यकर्ते मारले गेले. आम्ही तर संपूर्ण देशभरात निवडणूक लढवत आहोत. अन्य ठिकाणी हिंसाचार का झाला नाही?. हिंसा आमच्यामुळे होत असेल तर मग अन्य ठिकाणीदेखील झाली असती. मीडियानं ममतांना विचारायला हवं की तेथेच अशा घटना का घडतात?

BJP President Amit Shah: We started our election campaign from January 16...Our target was to win 120 Lok Sabha seats which we couldn't win the last time. We are confident that we'll receive good results pic.twitter.com/P80DRk8Tqz

दरम्यान,19 मे रोजी लोकसभा निवडणुकीतील शेवटच्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. भाजप, काँग्रेससहीत अन्य राजकीय पक्षांच्या उमेदवारांमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. यानंतर 23 मे रोजी निवडणुकीचा निकाल स्पष्ट होणार आहेत

VIDEO: पश्चिम बंगालमध्ये पुन्हा राडा, भाजप नेत्यांच्या गाड्या फोडल्या

First published: May 17, 2019, 4:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading