चार महिन्यात 1900 मुलं बेपत्ता, पोलिसांनी शोधून काढली केवळ इतकीच मुलं
चार महिन्यात 1900 मुलं बेपत्ता, पोलिसांनी शोधून काढली केवळ इतकीच मुलं
गेल्या चार महिन्यांत सुमारे 1900 मुले बेपत्ता झाली आहेत. हरवलेली बहुतेक मुले 12-18 वयोगटातील होती आणि या वयोगटातील बेपत्ता मुलांची एकूण संख्या सुमारे 1,583 होती.
नवी दिल्ली, 27 मे: देशाची राजधानी (National capital) दिल्लीत (Delhi) गेल्या चार महिन्यांत सुमारे 1900 मुले बेपत्ता झाली आहेत. त्यापैकी केवळ निम्म्याचाच शोध लागला आहे. अलीकडेच दिल्ली पोलिसांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या चार महिन्यांत शहरात 1879 मुले बेपत्ता झाली (Missing Children) आहेत. हरवलेली बहुतेक मुले 12-18 वयोगटातील होती आणि या वयोगटातील बेपत्ता मुलांची एकूण संख्या सुमारे 1,583 होती. मात्र 1178 मुलांचा ट्रॅक काढण्यात दिल्ली पोलिसांना यश आलं आहे.
टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनुसार, 12-18 वयोगटातील हरवलेल्या मुलांची संख्या गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत यावर्षी 2% वाढली आहे. त्याचवेळी 0-8 वयोगटातील 138 मुले बेपत्ता झाल्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत 10% ची घट झाली आहे. या वर्षी गेल्या चार महिन्यांत 8 ते 11 वयोगटातील 158 मुले बेपत्ता झाली आहेत. त्याचवेळी पोलिसांनी विविध वयोगटातील 980, 92 आणि 106 मुलांचा शोध घेतला.
बहिणीसोबतच्या रिलेशनशिपमुळे भडकला मुस्लिम बांधव, 25 वर्षीय तरुणाची केली हत्या
बेपत्ता व्यक्ती आणि फेशियल रेकग्निशन सिस्टम सॉफ्टवेअर जिपनेट बेपत्ता मुलांचा शोध घेण्यास मदत करते असं दिल्ली पोलिसांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर पोलिसांचे पथक अनेकदा इतर राज्यात जाऊन मुलांचा शोध घेण्यासाठी शेल्टर होमचा शोधत होते. पोलिसांचे म्हणणे आहे की, बहुतेक प्रकरणांमध्ये मुले आर्थिक दुर्बल कुटुंबातील होती. एका अधिकाऱ्याने सांगितले की, काहीवेळा कुटुंबांकडे मुलांची फोटोही नसतात, त्यामुळे आम्हाला इतर पुराव्याच्या मदतीने त्यांचा शोध घ्यावा लागतो.
अहवालानुसार, 12-18 वर्षांची मुले बेपत्ता झाल्याबद्दल बोलत असताना बाल कल्याण समितीच्या एका सदस्याने खुलासा केला की, आमच्या समितीकडे नोंदवलेल्या अशा बहुतेक प्रकरणांमध्ये मुलींमुळे मुले घरातून पळून गेल्याचे आढळले. एवढंच नाही तर पालकांची काळजी नसणं हे देखील एक कारण होतं. त्याच वेळी, पालक देखील त्यांच्या मुलांमधील वर्तन बदल किंवा बाहेरील लोकांचे त्यांच्या मुलांबद्दलचे वर्तन लक्षात घेण्यास अपयशी ठरले आहेत. मुलांनी घर सोडण्याचं आणखी एक मोठं कारण म्हणजे विशिष्ट ठिकाणांबद्दलचं आकर्षण.
पुराचा कहर सुरूच; 30 जणांचा मृत्यू, 5 लाखांहून अधिक प्रभावित
अलीकडील एका प्रकरणात, गुन्हे शाखेच्या मानवी तस्करीविरोधी युनिटने मुंबईतून अलीपूर येथील दोन बेपत्ता बहिणींचा ट्रॅक काढला, जिथे त्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये नशीब आजमावण्यासाठी गेल्या होत्या. दोघांनी इन्स्पेक्टर वीरेंद्र कुमार आणि त्यांची डिटेक्टिव्ह कॉन्स्टेबल सुकन्या यांना सांगितले की, ते मुंबईच्या जीवनशैलीकडे आकर्षित झाले आहेत आणि त्यामुळेच त्यांनी घर सोडले आहे.
Published by:Pooja Vichare
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.