नरेंद्र मोदींची NDAच्या नेतेपदी एकमतानं निवड, पंतप्रधानपदासाठीही 353 खासदारांचं पूर्ण समर्थन

नरेंद्र मोदींची NDAच्या नेतेपदी एकमतानं निवड, पंतप्रधानपदासाठीही 353 खासदारांचं पूर्ण समर्थन

नरेंद्र मोदी शनिवारी(25 मे) रात्री 8 वाजता राष्ट्रपतींची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 25 मे : एनडीएच्या नेतेपदी नरेंद्र मोदी यांची एकमतानं निवड करण्यात आली आहे. राजधानी नवी दिल्लीत एनडीएची बैठक पार पडली. या बैठकीत एनडीएच्या नेतेपदी नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. शिवाय, 353 खासदारांनी देशाचे पंतप्रधान म्हणून देखील नरेंद्र मोदींच्या नावाला आपलं समर्थन दर्शवलं. शिरोमणि अकाली दलाचे नेते प्रकाश सिंह बादल यांनी एनडीएच्या नेतेपदी नरेंद्र मोदी यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावास जेडीयू अध्यक्ष नितीश कुमार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, एलजेपी अध्यक्ष रामविलास पासवान यांच्यासहीत एनडीएच्या घटक पक्षांनी आपलं समर्थनं दिलं. यानंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सर्वांचे आभार मानले आणि नरेंद्र मोदींना शुभेच्छा देखील दिल्या.

पाहा :VIDEO : सेंट्रल हॉलमध्ये उद्धव ठाकरेंची सेनेकडून नरेंद्र मोदींसाठी घोषणा

'अधिकाधिक मनं जिंकण्याचा प्रयत्न'

'NDAच्या सर्व नेत्यांनी मला आशीवार्द दिला आहे. तुम्ही मला नेत्याच्या स्वरूपात स्वीकारलं. यास मी व्यवस्थेचा एक भाग मानतो. मी देखील तुमच्यातीलच एक व्यक्ती आहे. तुमच्या समानच आहे. खांद्याला खांदा मिळवून आपल्याला एकत्र चालायला हवं', असं म्हणत नरेंद्र मोदी उपस्थितांना संबोधित करण्यास सुरुवात केली.

मोदींनी संविधानाला केलं नमन

NDAच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी संविधान ग्रंथासमोर डोकं झुकवून त्यास नमन केलं.

पाहा :VIDEO : सेंट्रल हॉलमध्ये 'वंदे मातरम्' आणि 'मोदी मोदी' जयघोष

'नरेंद्र मोदी प्रयोग यशस्वी' -अमित शहा

'ज्या प्रकारे नरेंद्र मोदींनी पाच वर्ष सरकार चालवलं, त्यास देशाच्या जनतेनं स्वीकारलं आहे. देशाच्या जनतेनं पुन्हा एकदा नरेंद्र मोदी प्रयोगास मनापासून स्वीकारलं आणि हा प्रयोग पुन्हा यशस्वी केला आहे', अशा शब्दांत अमित शहा यांनी नरेंद्र मोदींचं कौतुक केलं.

पाहा VIDEO : निकालामुळे ममतादीदी निराश, केली मोठी घोषणा

जनतेचं कौल म्हणजे विश्वासाचं प्रतीक

अमित शहा यांनी यावेळेस सांगितले की, 'गेल्या पाच वर्षात सत्तेच्या कार्यकाळात सबका साथ, सबका विकास याच धर्तीवर देशातील लोकांची सेवा केली. म्हणून यंदा जनतेनं बहुमतानं एनडीएला विजय मिळवून दिला आहे.1971 सालानंतर देशात पाच वर्ष पूर्ण करून सलग दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे नरेंद्र मोदी हे दुसरे नेते आहेत. मोदींना जनतेचा मिळालेला कौल म्हणजे विश्वासाचं प्रतीक आहे'.

'घराणेशाही, जातीयवादास जनतेनं नाकारलं'

देशाच्या निवडणुकीत घराणेशाही, जातीयवाद पाहण्यास मिळत होती, पण या निवडणुकीत जनतेनं घराणेशाही, जातीयवादास नाकारल्याचं अमित शहांनी सांगितलं.

मोदींवर दाखवला विश्वास - शहा

देशातील जनतेनं नरेंद्र मोदींवर विश्वास दाखवला आहे. गरिबातील गरीब जनतेनंदेखील मोदींच्या नेतृत्वास आपला विश्वास दर्शवला आहे, असेही यावेळेस शहा यांनी म्हटलं.

पंतप्रधान मोदी सत्तास्थापनेचा करणार दावा

नरेंद्र मोदी शनिवारी (25 मे) रात्री 8 वाजता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत. दरम्यान, शुक्रवारी (24 मे) संध्याकाळी नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींची भेट घेऊन आपल्या मंत्रिमंडळाचा सामूहिक राजीनामा सादर केला होता. राष्ट्रपतींनीही हा सामूहिक राजीनामा स्वीकारून सोळावी लोकसभा भंग केली. नवीन सरकार स्थापन होईपर्यंत नरेंद्र मोदी हे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून आपलं कार्य करतील.

30 मे रोजी शपथविधी

नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. मोदींनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मोदींना सरकार स्थापनेचं आमंत्रण दिलं. आता 30 मे रोजी मोदी सरकारचा शपथविधी सोहळा असणार आहे. शपथविधीपूर्वी नरेंद्र मोदी गुजरातमध्ये जाऊन आपल्या आईचे आशीर्वाद घेणार आहेत. त्यानंतर ते त्यांच्या वाराणसी मतदारसंघात जाऊन मतदारांचे आभारदेखील मानणार आहेत.

SPECIAL REPORT : मृत्यूच्या दारातून लहानग्यांना खेचून आणणाऱ्या 'हिरो'ने सांगितली थरारक कहाणी

First published: May 25, 2019, 6:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading