#MeToo : अकबर यांच्या चौकशीपूर्वी आरोपांमधील तथ्य पाहणं महत्त्वाचं - अमित शाह

#MeToo : अकबर यांच्या चौकशीपूर्वी आरोपांमधील तथ्य पाहणं महत्त्वाचं - अमित शाह

केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्याविरोधातील लैंगिक शोषणाच्या आरोपांची चौकशी केली जाणार असल्याची माहिती भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी दिलीय.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर : केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्याविरोधातील लैंगिक शोषणाच्या आरोपांची चौकशी केली जाणार असल्याची माहिती भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी दिलीय. पण या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे, हेही पाहावं लागेल, असंही शहा म्हणाले.

एम. जे. अकबर यांच्याविषयी पक्षाकडून आलेली ही पहिलीच अधिकृत प्रतिक्रिया आहे. #MeToo  मोहिमेंतर्गत एम. जे. अकबर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप झाले आहेत. यानंतर परदेशात असणाऱ्या अकबर यांना सरकारने ताबडतोब भारतात बोलावून घेतले असून, ते आज भारतात परतणार आहेत. अकबर हे मीडिया संस्थांमध्ये संपादक म्हणून कार्यरत असताना अनेक महिला पत्रकारांसोबत त्यांनी आक्षेपार्ह वर्तन केल्याचा आरोप झालाय.

काँग्रेसनेही केली होती अकबर यांच्या राजीनाम्याची मागणी

#MeToo चळवळीत लैंगिक छळाचा आरोप झालेले परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री एम.जे.अकबर यांची हकालपट्टी करावी अशी मागणी काँग्रेसनेही केली होती. पक्षाचे प्रवक्ते जयपाल रेड्डी यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली. अकबर यांच्यावर चार महिला पत्रकारांनी लैंगिक छळाचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांच्या राजीनाम्यासाठी सरकारवर दबाव येतोय. त्यांनी राजीनामा दिला नाही तर त्यांची हकालपट्टी करा अशी मागणीही होतेय.

शिवसेनेनेही साधला होता भाजपवर निशाणा

अकबर यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप झाले असताना अजून ते मंत्रीपदावर कसे आहेत असा सवाल शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी केला होता. अकबर यांच्या राजीनाम्याची मागणी करत असताना मनिषा कायंदे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावरही हल्लाबोल केला होता. मुंबईच्या पावसावर 'मन की बात' मध्ये बोलणारे पंतप्रधान अकबर यांच्याबाबतीत मौन का बाळगून आहेत, असा सवाल त्यांनी केला होता. भाजप महिलांच्या हक्कांविषयी गंभीर नसून, 'बेटी बचाव, बेटी पढाव' ही घोषणा फक्त दाखवण्यासाठीच आहे असा आरोपही त्यांनी केला होता.

शरीर संबंधाच्या प्रचारासाठी त्याने जगभरात स्थापन केली संस्था

First published: October 13, 2018, 5:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading