'पंतप्रधान बदलावे लागले तरी चालेल; पण शेतकरी अपमान सहन करणार नाही'

'पंतप्रधान बदलावे लागले तरी चालेल; पण शेतकरी अपमान सहन करणार नाही'

दिल्लीतल्या रामलिला मैदानावर जमलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधतांना राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हा घणाघाती प्रहार केला.

  • Share this:

नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेला खोटी आश्र्वासनं देत आहेत. त्यामुळे आता सरकारच काय; पंतप्रधान सुद्धा बदलावे लागले तरी चालेल, पण आता देशातला शेतकरी आता अपमान सहन करणार नाही असा घणाघाती प्रहार कॉंग्रस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. किसान मुक्ती मोर्चानिमित्त दिल्लीतल्या रामलिला मैदानावर जमलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधतांना राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हा घणाघाती प्रहार केला.

हिवाळी अधिवेश सुरू होणयापूर्वीच देशभरातून जमलेल्या शेतकऱ्यांचा किसान मुक्ति मोर्चा संसदेवर शुक्रवारी धडकणार होता. यानिमित्त देशाच्या कानाकोपऱ्यातून नवी दिल्लीतल्या रामलिला मैदानावर शेतकरी एकवटले आहेत. जमलेल्या शेतकरी बांधवांशी संवाद साधतांना राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.

लाखोच्या संख्येने जमलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधताना राहुल गांधी म्हणाले की, 2019 च्या निवडणुका लक्षात घेऊन मोदी सरकारने फक्त राम मंदिराच्या मुद्यावर लक्ष केंद्रित केलं आहे. पण जगाचा पोशिंदा मात्र त्यात भरडला जात आहे. देशातला शेतकरी कोणतं गिफ्ट मागत नाहीये. पण, पंतप्रधान नरेंद मोदी केवळ खोटी आश्वासनं देताहेत. आपल्या न्याय हक्कासाठी लढणारे देशातले शेतकरी यापुढे आपला आपला अपमान मुळीच सहन करणार नाहीत असं राहुल म्हणाले.

आपल्या न्याय हक्कांसाठी सरकार बदलावं लागलं तरी चालेल, देशाचा पंतप्रधान बदलावा लागला तरी चालेल पण यापुढे जगाचा पोशिंदा अजिबात खोटी आश्वासंनं सहन करणार नाही असा घणाघाती आरोप करतांना, राहुल यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या मुद्यावर विशेष सत्र असायला हवं असं मत व्यक्त केलं.

आपल्या न्याय हक्कांसाठी देशातला शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात दिल्लीतल्या रामलिला मैदानावर जमला आहे. बुधवारपासूनच रामलिलावर शेतकरी जमायला सुरुवात झाली होती. किसान मुक्ती मोर्चानिमित्त शुक्रवारी लाखोच्या संख्येने जमलेल्या शेतकऱ्यांना राहुल यांनी देशात सत्तांतर घडवून आणण्याचं यावेळी आवाहन केलं.

 काचेच्या प्लेट उचलून ठेवताना पडल्या अंगावर, श्वास रोखायला लावणार CCTV

First published: November 30, 2018, 4:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading