लग्नाचा वाढदिवस विसरला नवरा, रागात पत्नीनं केलं असं काही की वाचून बसेल धक्का

लग्नाचा वाढदिवस विसरला नवरा, रागात पत्नीनं केलं असं काही की वाचून बसेल धक्का

कोरोनाच्या संकटात राजधानी दिल्ली एका वेगळ्याच घटनेमुळं हादरलं. दिल्लीतील मानससरोवर पार्कमधील एक शिक्षिकेनं एका शुल्लक कारणावरून आत्महत्या केली.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 मे : कोरोनाच्या संकटात राजधानी दिल्ली एका वेगळ्याच घटनेमुळं हादरलं. दिल्लीतील मानससरोवर पार्कमधील एक शिक्षिकेनं एका शुल्लक कारणावरून आत्महत्या केली. पतीनं दिलेल्या माहितीनुसार, तो लग्नाचा वाढदिवस विसरला होता, यामुळं गेले काही दिवस पत्नी नाराज होती. मात्र सोमवारी रात्री पती झोपलेला असताना तिनं आत्महत्या केली. तर, मुलीच्या घरच्यांनी हुंड्यावरून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणीचे नाव आकांक्षा (वय-27 वर्ष) असून तिनं कोणतीही सुसाइड नोट सोडलेली नाही आहे. सध्या दिल्ली पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही आहे.

वाचा-मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात, बहुजन विकास आघाडीच्या नेत्याचा मृत्यू

पतीचे होते अफेअर, मुलीच्या घरच्यांचा आरोप

पोलिसांना मिळालेल्या तक्रारीनुसार, मृत आकांक्षा परिवारसोबत मानसरोवर पार्कच्या नथू कॉलनीमध्ये राहत होती. पती अंकुरशिवाय कुटुंबात इतरही सदस्य आहेत. आकांक्षा एका सरकारी शाळेत शिकवते, तर अंकित एका खासगी कंपनीत नोकरी करतो. आकांक्षाच्या आईनं असा आरोप केला आहे की अंकितचे दुसर्याक एका महिलेसोबत प्रेमसंबंध आहेत.

वाचा-लॉकडाऊनमध्ये दारूची पार्टी पोहोचली मर्डरपर्यंत, चखण्यामुळे केले मित्रावरच वार

आकांक्षा 6 महिन्यापासून देत नव्हती पैसे

आकांक्षाची आई संतोष देवी यांनी सांगितले की, 11 मे 2018 रोजी आकांक्षा आणि अंकितचे लग्न झाले. त्यांचा आरोप आहे की सासरचे लोक तिला हुंड्यासाठी त्रास देत होते. आकांक्षाचा पगारही बळजबरीने घेत होते. जवळपास सहा महिन्यांपासून आकांक्षा तिचा पगार देत नव्हती. यामुळे कुटुंबात खूप भांडणं होत होती.

वाचा-ज्याच्या घरी केली चोरी तोच निघाला कोरोना पॉझिटिव्ह, आता चोरांची अशी झाली अवस्था

11 मे रोजी होता लग्नाचा वाढदिवस

तर अंकितने पोलिसांना सांगितले की, त्यांच्या लग्नाचा वाढदिवस विरसल्यामुळे आंकाक्षा नाराज होती. रात्री, जेव्हा जेवणास सुरवात केली तेव्हा आकांक्षा दुसर्यास खोलीत गेली आणि गळफास लावून घेतला. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठविला.

First published: May 13, 2020, 1:00 PM IST

ताज्या बातम्या