फोन लागला नाही म्हणून प्रियकरावर बलात्काराचा गुन्हा!

दिल्लीतील मुखर्जी नगरमध्ये एका मुलीने प्रियकरावर बलात्काराचा गुन्हा दाखल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 19, 2019 03:34 PM IST

फोन लागला नाही म्हणून प्रियकरावर बलात्काराचा गुन्हा!

नवी दिल्ली, 19 मार्च: खराब मोबाईल नेटवर्कमुळे तुमचा फोन लागला नाही तर फार तर फार तुम्हाला मनस्ताप सहन करावा लागेल. पण नेटवर्क नसल्यामुळे जर तुमच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला तर? वाचून धक्का बसेल अशी ही घटना खरोखर घडली आहे. दिल्लीतील मुखर्जी नगरमध्ये एका मुलीने प्रियकरावर बलात्काराचा गुन्हा दाखल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या संबंधित मुलीने प्रियकराला अनेक वेळा फोन लावला.पण खराब नेटवर्कमुळे फोन लागला नाही.फोन न लागल्याने मुलीला वाटले की प्रियकराने फसवले आणि तिने थेट रागाच्या भरात पोलिसांत बलात्काराची तक्रार दाखल केली. त्यानंतर हे प्रकरण थेट न्यायालयात पोहोचले.संबंधित मुलीने तक्रारीत जुलै ते सप्टेंबर 2017 या काळात लौंगिक शोषणाचा आरोप केला होता. तसेच 2 जुलै रोजी प्रियकराने आपल्याशी विवाह केल्याचे कोर्टात सांगितले.

कोर्टात सुनावणी सुरु झाल्यानंतर संबंधित मुलीने एका सोशल वर्करच्या सांगण्यावरुन बलात्काराची तक्रार दाखल केल्याचे सांगितले. इतक नव्हे तर कोणाच्याही दबावावरुन हा जबाब देत नसल्याचे मुलीने कोर्टात म्हटले. ज्या प्रियकरावर बलात्काराचा आरोप करण्यात आला होता. तो काही दिवसांसाठी गावी गेला होता. या काळात मुलीने अनेक वेळा फोन केला. पण नेटवर्क नसल्यामुळे दोघांचा संपर्क होऊ शकला नाही. फोन न लागल्याने मुलीला वाटले की प्रियकराने फसवले. त्यामुळे तिने थेट पोलिसात बलात्काराची तत्कार दाखल केली.


धावती ट्रेन पकडताना युवकाचा पाय घसरला; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags: new delhi
First Published: Mar 19, 2019 03:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close