राज्यसभेच्या उपसभापती पदासाठी अहमद पटेलांनी घेतली ममता बॅनर्जींची भेट

राज्यसभेच्या उपसभापती पदासाठी काँग्रेस माजी अध्यक्षा सोनिया गांधींचे राजकीय सचिव अहमद पटेल यांनी ममता बॅनर्जींची भेट घेतली. ही भेट पक्षाच्या उपसभापती उमेदवारीच्या समर्थनार्थ होती.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jun 18, 2018 01:02 PM IST

राज्यसभेच्या उपसभापती पदासाठी अहमद पटेलांनी घेतली ममता बॅनर्जींची भेट

नवी दिल्ली, १८ जून : लवकरच राज्यसभेच्या उपसभापती निवडणुकीत विरोधी पक्षांची एकजूट पाहायला मिळण्याची शक्यता आहे. राज्यसभेच्या उपसभापती पदासाठी काँग्रेस माजी अध्यक्षा सोनिया गांधींचे राजकीय सचिव अहमद पटेल यांनी ममता बॅनर्जींची भेट घेतली. ही भेट पक्षाच्या उपसभापती उमेदवारीच्या समर्थनार्थ होती.

न्यूज१८च्या सूत्रांच्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी पटेल आणि ममता बॅनर्जी यांची भेट झाली. एक तास दोघांची बातचीत झाली. काँग्रेस आपल्या उमेदवारासाठी समर्थन गोळा करतंय.

सध्या हे पद केरळचे पी.जे. कुरियन यांच्याकडे आहे. काँग्रेसनं दुसऱ्या कार्यकाळासाठी त्यांची निवड केलेली नाही. याचा अर्थ काँग्रेस दुसऱ्या व्यक्तीला हे पद देऊ पाहतेय.

भारताचा उपराष्ट्रपती राज्यसभेचा सभापती असतो. उपराष्ट्रपतीची निवड लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य करतात. तर उपसभापतीची निवड फक्त राज्यसभेचे सदस्य करतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 18, 2018 11:24 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...