Home /News /national /

‘राष्ट्रपती भवना’त निघाला कोब्रा, सर्पमित्रांना तासभर दिली हुलकावणी!

‘राष्ट्रपती भवना’त निघाला कोब्रा, सर्पमित्रांना तासभर दिली हुलकावणी!

'भारतात 270 प्रकारचे साप आढळतात. कोब्रा हा त्यातला विषारी असल्याने त्याला हाताळतांना जास्त काळजी घ्यावी लागते.'

    नवी दिल्ली 09 सप्टेंबर: भारताच्या राष्ट्रपतींचं निवासस्थान असलेलं ‘रायसीना हिल’ हे आपल्या दिमाख आणि रुबाबसाठी जगात ओळखलं जातं. विस्तिर्ण परिसर आणि झाडांची गर्दी यामुळे राष्ट्रपती भवनाचा सगळाच परिसर हा अतिशय देखणा आहे. जगभरातली उत्तमोत्तम झाडं आणि लता-वेली इथं लावण्यात आल्या आहेत. अशा या परिसरात बुधवारी कोब्रा साप आढळला. गेट नंबर 8 जवळ तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांना हा साप दिसल्याने एकच धावपळ उडाली. तातडीने सर्प वाईल्ड लाइफ (wildlife) विभागाच्या एका पथकाला राष्ट्रपती भवनात पाचारण करण्यात आलं होतं. या सर्पमित्रांनी कोब्रा पकडण्यासाठी प्रयत्न केला. पण झाडांमुळे तो लवकर हातीच लागत नव्हता. त्याला लपण्यासाठी भरपूर जागा असल्याने तो हाती लागत नव्हता. मात्र तासभराच्या प्रयत्नानंतर या सर्पमित्रांनी अखेर कोब्रा ताब्यात घेतला. काही काळ त्याला निरिक्षणाखाली ठेवण्यात आलं होतं. नंतर त्याला जंगलात सोडून देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. भारतात 270 प्रकारचे साप आढळतात. कोब्रा हा त्यातला विषारी असल्याने त्यला हाताळतांना जास्त काळजी घ्यावी लागते असं वाईल्ड लाईफ SOSचे सीईओ आणि सह-संस्थापक कार्तिक सत्यनारायण यांनी सांगितलं. राष्ट्रपती भवनातं मुगल गार्डन हे अतिशय सुंदर असून जगात आढळणाऱ्या गुलाबांच्या जवळपास सर्वच जाती तिथे लावण्यात आल्या आहेत. त्याच बरोबर अनक जातींचे पक्षी आणि प्राणीही तिथे आहेत. प्रत्येक राष्ट्रपतींनी आपल्या कार्यकाळात राष्ट्रपती भवनात काहीतरी नवीन उपक्रम राबवला असून त्यात भर घातली आहे. एपीजे अब्दुल कलाम हे राष्ट्रपती असतांना राष्ट्रपती भवन हे जास्त लोकाभिमुख झालं होतं असं म्हटलं जातं.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Rashtrapati bhavan

    पुढील बातम्या