नवी दिल्ली, 14 मार्च: भारतीय संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शमीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याविरुद्ध आयपीसी कलम 498 A नुसार हुंड्यासाठी छळ केल्याचा तसेच कलम 354A नुसार लैंगिक शोषणचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहम्मद शमी आणि पत्नी हसीन यांच्यात गेल्या अनेक महिन्यांपासून भांडण सुरू आहे. हसीनाने शमी हा आपल्याला मारपीट करतो, छळ करतो असा आरोप केला होता. मोहम्मदचे एका पाकिस्तानी मुलीसोबत अनैतिक संबंध असल्याचंही तिने म्हटलं होतं. त्याचबरोबर मोहम्मद हा मॅच फिक्सिंगमध्ये सहभागी असल्याचा आरोपही तिने केला होता.
A chargesheet has been filed against cricketer Mohammed Shami. He has been charged under IPC 498A (dowry harassment) and 354A (sexual harrasment).
— ANI (@ANI) March 14, 2019
(file pic) pic.twitter.com/6o6sBbtqY8
हसीनाने मोहम्मद विरूध्द कोर्टात खटला दाखल करत मुलीच्या पालन पोषणासाठी दरमहिना 10 लाख देण्याची मागणी केली होती. मात्र कोर्टानं तिची ही मागणी फेटाळत तिला महिन्याला 80 हजार रूपये देण्याचा आदेश दिला.
VIDEO : माझे वडील आज हयात नाही, पवारांचं असं बोलणं किती योग्यतेचं? - विखे पाटील