Home /News /national /

दिल्लीत नितीन गडकरींची मोठी घोषणा; जयंत पाटील आणि देवेंद्र फडणवीसही होते उपस्थित

दिल्लीत नितीन गडकरींची मोठी घोषणा; जयंत पाटील आणि देवेंद्र फडणवीसही होते उपस्थित

केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी एक मोठी घोषणा केली आहे.

नवी दिल्ली, 27 जानेवारी : नागपूर येथील नाग नदी आणि पुणे येथील मुळा-मुठा नदी पुर्नरूज्जीवन योजनेतंर्गत विकासकामांसाठी 1 हजार कोटी रूपयांच्या निविदांना मंजुरी देण्याचा निर्णय आज घेण्यात आल्याची माहिती, केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी दिली आहे. केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली आज त्यांच्या निवासस्थानी आयोजित महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्पांची प्रगती आणि समस्या संदर्भात आढावा घेण्यात आला. या बैठकीस केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत, माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावेडकर, राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार ग‍िरीष बापट, डॉ. सुभाष भामरे, सुनिल मेंढे आणि जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार गौतम तसेच केंद्र व राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. हेही वाचा - भाजपच्या वेबसाईटवर खासदार रक्षा खडसे यांचा वादग्रस्त उल्लेख, गृहमंत्री संतापले पुण्यातील मुळा-मुठानदी आणि नागपुरातील नागनदीच्या पुर्नरूज्जीवन योजनेतंर्गत विविध कामांचा आढावा याबैठकीत घेण्यात आला. या योजनेतंर्गत करावयाच्या विविध विकास कामांसाठी जपानच्या जायका कंपनीसोबत करार करण्यात आलेला आहे. पुण्यातील मुळा-मुठा नदी विकासकामांसाठी 1200 कोटी रूपयांचा खर्च येणार आहे. तर नागनदी विकासकामांसाठी 1700 कोटी रूपये खर्च येणार आहे. आजच्या बैठकीत या दोन्ही नद्यांच्या पुर्नरूज्जीवनसंदर्भातील विविध विकासकामांसाठी एक हजार कोटी रूपयांच्या निव‍िदांना मंजुरी देण्यात आली असल्याचे केंद्रीय मंत्री गडकरी यांनी बैठकीनंतर आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले. यासह केंद्रीय जलशक्ती मंत्री शेखावत यांच्याकडून नागनदी पुर्नरूज्जीवन योजनेसाठी आखलेल्या समितीमध्ये पर्यावरण विषयक तज्ज्ञ नेमण्याच्या सूचना करण्यात आल्‍याचे गडकरी यांनी सांगितले. केंद्रीय मंत्री गडकरी यावेळी म्हणाले, राज्यातील बहुतांश जलसिंचनाचे प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचा केंद्र सरकारचा माणूस आहे यासाठी राज्य सरकारला केंद्र सरकारच्या वतीने अतिरिक्त मला देखील करण्यात येणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या प्रकल्पांना पूर्ण करून लवकरात लवकर महाराष्ट्राची जलसिंचनाची सीमा वाढवण्याचा देखील निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Jayant patil, Nitin gadkari

पुढील बातम्या