मराठी बातम्या /बातम्या /देश /

Cyclone Alert : अंदमानच्या किनारपट्टीवर चक्रीवादळाचे संकेत; कुठे आणि कसे जाणवणार परिणाम?

Cyclone Alert : अंदमानच्या किनारपट्टीवर चक्रीवादळाचे संकेत; कुठे आणि कसे जाणवणार परिणाम?

एकीकडे उन्हाळ्याच्या काहिलीनं नागरिक त्रस्त असताना, दुसरीकडे दक्षिण अंदमानच्या समुद्रात चक्रीवादळ तयार होण्याचे संकेत मिळत आहेत. या स्थितीमुळे 6 मेच्या सुमारास या प्रदेशात कमी दाबाचं क्षेत्र (Low Pressure Area) तयार होण्याची शक्यता आहे

पुढे वाचा ...
नवी दिल्ली 02 मे : दक्षिण अंदमानच्या (South Andaman) समुद्रात चक्रीवादळ (Cyclone) तयार होत असून, या स्थितीचं सातत्यानं निरीक्षण सुरू आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागानं (IMD) दिली आहे. मात्र, सध्या या चक्रीवादळाची दिशा आणि अन्य तपशीलांबाबत माहिती देणं घाईचं ठरेल, असंही `आयएमडी`नं म्हटलं आहे. सध्या देशातल्या बहुतांश भागांत तीव्र उन्हाळा जाणवत आहे. अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट (Heat Wave) आली असून, या भागांतील कमाल तापमान लक्षणीय प्रमाणात वाढलं आहे. एकीकडे उन्हाळ्याच्या काहिलीनं नागरिक त्रस्त असताना, दुसरीकडे दक्षिण अंदमानच्या समुद्रात चक्रीवादळ तयार होण्याचे संकेत मिळत आहेत. या स्थितीमुळे 6 मेच्या सुमारास या प्रदेशात कमी दाबाचं क्षेत्र (Low Pressure Area) तयार होण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. Heat Wave In Maharashtra: राज्यात सूर्य आग ओकतोय..! दोन महिन्यात उष्माघाताचे 25 बळी, सर्वाधिक मृत्यू नागपुरात ``आम्ही 4 मे रोजी दक्षिण अंदमानच्या समुद्रात चक्रीवादळाच्या संभाव्य निर्मितीवर लक्ष ठेवून आहोत. त्यामुळे 6 मे रोजी या परिसरात कमी दाबाची स्थिती निर्माण होऊ शकते आणि 24 तासांनंतर ही स्थिती अधिक व्यापक होऊ शकते,`` असं प्रादेशिक हवामान केंद्राचे उपमहासंचालक संजीव बंदोपाध्याय यांनी सांगितलं. ``या चक्रीवादळाबाबत आताच अंदाज व्यक्त करणं किंवा त्याच्या दिशेविषयी भाष्य करणं थोडं अवघड आहे. मे महिना सुरू झाला आहे आणि अंदमानच्या समुद्रात चक्रीवादळ निर्माण होत आहे, त्यामुळे कमी दाबाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता अधिक आहे. परंतु, या स्थितीबाबत एक ते दोन दिवसांत अधिक स्पष्टपणे भाष्य करता येईल,`` असं प्रादेशिक हवामान केंद्राचे संचालक जी. के. दास यांनी `पीटीआय`ला सांगितलं. कोरोनाची लस घेण्यासाठी कोणालाही बळजबरी केली जाऊ शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश कोलकात्यासह अन्य जिल्ह्यांमध्ये पाऊस कोलकाता (Kolkata) आणि दक्षिण बंगालमधल्या काही जिल्ह्यांमध्ये दोन महिन्यांनंतर शनिवारी (30 एप्रिल) चक्रीवादळापूर्वीच पावसाला (Rainfall) सुरूवात झाली आहे. या भागात पावसाचा अंदाज या पूर्वीच हवामान विभागाने जाहीर केला होता. रविवारी (1 मे) उत्तर सीमेवरील दमदम येथे 3.2 मिमी पावसाची नोंद झाली. कोलकातामधील अलीपूर प्रादेशिक हवामान केंद्रात 13.7 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. वर्षातलं पहिलं चक्रीवादळ आलं होतं मार्चमध्ये या पूर्वी मार्च महिन्यातल्या तिसऱ्या आठवड्यात अर्थात 21 मार्चला या वर्षातलं पहिलं चक्रीवादळ आलं होतं. आग्नेय बंगालच्या खाडी क्षेत्रात असानी चक्रीवादळाची निर्मिती झाली होती. त्यामुळे अंदमान आणि निकोबार बेटावर जोरदार पाऊस झाला होता. परंतु, पूर्व किनारपट्टीवर या वादळाचा विशेष परिणाम दिसून आला नाही.
First published:

Tags: Rain fall, Weather forecast

पुढील बातम्या