धक्कादायक! 2 वर्षांच्या चिमुकलीमध्ये आढळला कोरोनाचा नवा स्ट्रेन

धक्कादायक! 2 वर्षांच्या चिमुकलीमध्ये आढळला कोरोनाचा नवा स्ट्रेन

इंग्लंडहून भारतात परलेल्या कुटुंबातील 4 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत त्यापैकी 2 वर्षांच्या चिमुकलीच्या नमुन्यांमध्ये नव्या कोरोनाचा स्ट्रेन सापडला आहे.

  • Share this:

मेरठ, 30 डिसेंबर : कोरोनातून सावरत असताना आता जगावर वर्षाअखेरीस पुन्हा एक नवीन संकट ओढवलं आहे. कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडल्यानं जगभरात खळबळ उडाली आहे. भारतात देखील युरोपीय देशांमधून आलेल्या काही नागरिकांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यानं प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा अलर्टवर आहे. याच दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. 2 वर्षांच्या चिमुकलीमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ब्रिटनहून एक कुटुंब उत्तर प्रदेशातील मेरठ इथे दाखल झालं. त्यानंतर कोरोनाची चाचणी करण्यात आली ही चाचणी पॉझिटिव्ह आल्यानं त्याचे नमुने दिल्लीला तपासणीसाठी देण्यात आले. 4 जणांच्या कुटुंबातील 2 वर्षीय चिमुकलीला नव्या कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून हे कुटुंब राहात असलेला परिसर पूर्णपणे सील करण्यात आला आहे.

या परिसरातील नागरिकांच्या प्रशासनाकडून चाचण्या केल्या जात आहेत. यापूर्वी युरोपी देशातून भारतात आलेल्या 6 जणांनाही कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लक्षणं दिसून आली आहेत. यापैकी बेंगळुरू 3, हैदराबाद 2 तर पुण्यातील एका व्यक्तीचे नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

हे वाचा-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नववर्षाची पार्टी करताना विसरू नका या 8 गोष्टी

25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर या काळात भारतात एकूण 33 हजार लोक युरोपीय देशांमधून मायदेशी परतले आहेत. त्यापैकी 114 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यांचे नमुने भारतातील वेगवेगळ्या 10 प्रयोग शाळांमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. भारतात देखील कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा शिरकाव झाल्यानं प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा अलर्टवर आहे, तसंच भीतीचं सावट असल्यानं सरकार आणि आरोग्य यंत्रणेकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

कोरोनाचा नवा स्ट्रेन ब्रिटनमध्ये आढळल्यानंतर युरोपमधील बर्‍याच देशांमध्ये हा सापडला आहे. आतापर्यंत डेन्मार्क, नेदरलँड्स, ऑस्ट्रेलिया, इटली, स्वीडन, फ्रान्स, स्पेन, स्वित्झर्लंड, जर्मनी, कॅनडा, जपान, लेबेनॉन, सिंगापूर आणि आता भारतात देखील नव्या कोरोनाचा शिरकाव होत असल्याचं आढळून आल्यानं भीतीचं वातावरण आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: December 30, 2020, 8:27 AM IST

ताज्या बातम्या