लखनऊ 6 मार्च : पुलवामातल्या हल्ल्यावरून सुरू असलेलं राजकारण थांबण्याची चिन्ह नाहीत. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांनी पुलवामा इथं दुर्घटना घडली होती असं वक्तव्य केलं होतं. त्यावरून भाजपने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. आता उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मोर्य यांनीही तसच वक्तव्य केल्याने त्या वादात भर पडली आहे.
पुलवामा इथं CRPF जवानांसोबत जी दुर्घटना घडली त्यानंतर भारताने सडेतोड उत्तर दिलं असं वक्तव्य केशव प्रसाद मोर्य यांनी लखनऊ इथं बोलताना केलं होतं. त्यावर आता काँग्रेसने टीकेची झोड उठवली आहे. पुलवामातली घटना ही दुर्घटना नाही तर दहशतवादी हल्ला आहे. त्यामुळे त्याला दुर्घटना कसं म्हणता असा सवाल सोशल मीडियावर व्यक्त विचारण्यात येत आहे.
असंच वक्तव्य दिग्विजय सिंग यांनी केल्यावर त्यांच्यावर देशद्रोही असल्याची टीका झाली होती. आता भाजपचे उपमुख्यमंत्रीही देशद्रोही ठरतात का? असा पलटवार काँग्रेसने केला आहे.
UP Dy CM KP Maurya in Rohtak:Suraksha mein chuuk nahi hai,ye ek barhi durghatna hamare CRPF ke jawano ke sath gati thi.Iss sambandh mein PM ji ne bathaya hai ki sarkar ki oar se sena ko puri choot di gai hai, jo karwayi karna hai,jab karwayi karna hai vo sena karegi. (21.02.2019) pic.twitter.com/SrLkmee3ck
— ANI (@ANI) March 6, 2019
'तर खटला दाखल करा'
पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख 'दुर्घटना' म्हणून केल्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह नवीन वादात सापडले आहेत. शहीद जवानांचा अपमान करणाऱ्या वादग्रस्त ट्विटमुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून कडाडून टीका होऊ लागली आहे. भाजपकडूनही दिग्विजय यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
पण याउलट आता दिग्विजय सिंह यांनी भाजपालाच आव्हान दिले आहे. दिग्विजय सिंह यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, मी केलेल्या ट्विटवरून तुम्ही (भाजप)आणि तुमचे मंत्री माझ्यावर पाकिस्तान समर्थक असल्याचा, देशद्रोही असल्याचा आरोप करत आहेत. जर तुमच्यामध्ये हिम्मत असेल तर माझ्याविरोधात खटला दाखल करा'