खूशखबर, रेल्वेचं तत्काळ तिकीट रद्द केल्यावरही मिळणार पैसे !

खूशखबर, रेल्वेचं तत्काळ तिकीट रद्द केल्यावरही मिळणार पैसे !

यापुढे तत्काळ तिकीटावर 50 टक्के रिफंड मिळणार आहे. आताच्या नियमानुसार तत्काळमध्ये बुक केलेले तिकीट कॅन्सल केल्यास पैसे परत मिळत नसत

  • Share this:

28 जून : भारतीय रेल्वे 1 जुलैपासून तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये थोडे बदल करणार आहेत. हे बदल रेल्वेच्या प्रवाशांसाठी थोडे आनंददायी ही असतील. याची अधिकृत घोषणा अजून रेल्वेकडून व्हायची आहे.

आता यापुढे तत्काळ तिकीटावर 50 टक्के रिफंड मिळणार आहे. आताच्या नियमानुसार तत्काळमध्ये बुक केलेले तिकीट कॅन्सल केल्यास पैसे परत मिळत नसत. या नव्या नियमामुळे आता यात्रेकरूंना तत्काळमध्ये तिकीट कॅन्सल केल्यावर तिकीट बुकिंगची 50 टक्के रक्कम परत मिळत जाईल.याशिवाय अजून  कुठले बदल रेल्वे करणार आहे ते जाणून घेऊ या

1) तत्काळच्या बुकिंगच्या वेळेमध्ये बदल

आतापर्यंत तत्काळ तिकीट बुक करण्यासाठी 11 ते 12 असा वेळ ठरवण्यात आळा होता. आता हा वेळ बदलणार आहे. नवीन वेळेनुसार सकाळी 10 ते 11 दरम्यान तुम्हाला तिकीट बूक करता येईल. पण स्लिपर कोचचा वेळ सकाळी 11 ते 12 चं राहील.

2) वेटिंग तिकीट मिळणं होणार बंद

यापुढे रेल्वे वेटिंग तिकीट देणं बंद करणार आहे. आता फक्त वेटिंग किंवा आरएसीची तिकीट मिळतील.

3) वेगवेगळ्या भाषांमध्ये तिकीटं

आतापर्यंत तिकीट फक्त इंग्रजी भाषेमध्ये मिळत होती. यापुढे तिकीट इंग्रजीसोबतच इतरही भाषांमध्ये मिळणार आहे. यासाठी आयआरसीटीसीच्या साईटवर भाषेचा एक आॅप्शन अॅड केला जाणार आहे.

First published: June 28, 2017, 7:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading