नवरात्रीच्या मुहूर्तावर केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल ?

नवरात्रीच्या मुहूर्तावर केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल ?

केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकींपुर्वीचा हा सर्वात मोठा फेरबदल असणार आहे.

  • Share this:

कौस्तुभ, नवी दिल्ली

21 आॅगस्ट : केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकींपुर्वीचा हा सर्वात मोठा फेरबदल असणार आहे. जेडीयूचा एनडीएमध्ये झालेला प्रवेश, काही रिक्त असलेल्या जागा या पार्श्वभूमीवर या मंत्रिमंडळ विस्ताराकडे पाहिलं जातंय.तर महाराष्ट्रातून राजू शेट्टींच्या नावाचीही चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व मंत्र्यांचं प्रगतीपुस्तक तयार केलं असून, सुमार कामगिरी करणाऱ्या काही मंत्र्यांना नारळ मिळण्याची शक्यता आहे.

2019 पूर्वीच्या सगळ्यात मोठ्या केंद्रीय मंत्रीमंडळ विस्ताराच्या हालचाली दिल्लीत सुरु झाल्या आहेत. या विस्तारात मित्रपक्षांना समाधानी करण्यावर मोदींचा भर राहणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने समीकरण डोळ्यासमोर ठेऊन चेहरे या विस्तारात निवडले जातील.

लोकसभा निवडणुकीला अजून दीड वर्ष शिल्लक असले तरी भाजपने मात्र आपली तयारी आतापासूनच सुरू केली आहे. 350 जागा जिंकण्याची व्ह्युव रचना अमित शहा आखत आहे. त्याचाच एक भाग म्हणून येत्या महिन्याभरात केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा विस्तार होणार आहे. या विस्तारात भाजपने टार्गेट केलेल्या भागातील लोकांना जास्त संधी दिली जाईल असे संकेत मिळत आहे. या शिवाय विरोधी एकतेची हवा काढण्यासाठी एनडीएच्या घटक पक्षांना या विस्तारात खुश केले जाईल.

आता केंद्रात चंद्रा बाबू यांच्या TDP चे दोन मंत्री आहे त्यांना आणखी एक मंत्रीपद दिले जाईल. सरकार वर रोज टीका करणाऱ्या शिवसेनेला एक राज्यमंत्री पद दिले जाईल. नितीश कुमार यांच्या जदयू ला 2 मंत्रीपद दिले जाईल. महबुबा मुफ्ती यांच्या पक्षाला केंद्रात पहिल्यांच मंत्रीपद दिले जाईल

पण एनडीएत प्रवेश घेऊन सुद्धा अण्णाद्रमुकला या विस्तारात स्थान मिळणार नाहीये.

मंत्रिमंडळात कुठल्या चेहऱ्यांना घ्यायचे यावर मोदी आणि अमित शहा यांची एक बैठक झाली आहे. तसंच गेल्या आठवड्यात मोदींनी नितीन गड़कारींशी सुद्धा दीड तास स्वतंत्र चर्चा केली आहे. या विस्तारात राजू शेट्टी आणि राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांचा सुद्धा समावेश होऊ शकतो अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून दिल्लीच्या राजकीय वर्तुळात जोरात सुरू आहे पण सद्या तरी दोन्ही पक्ष याचा साफ इन्कार करतायेत.

पंतप्रधान मोदी आणि अमित शहा विस्ताराचा प्लान तयार केला आहे. त्यामुळे नेमकं काय होणार यावर कमालीची उत्सुकता आहे. पुढच्या आठवड्यात किंवा नवरात्रीत मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 21, 2017 06:54 PM IST

ताज्या बातम्या