मराठी बातम्या /बातम्या /देश /

हृदयद्रावक! Oxygen अभावी जुळ्या चिमुकल्यांचा मृत्यू

हृदयद्रावक! Oxygen अभावी जुळ्या चिमुकल्यांचा मृत्यू

Twins died due to Oxygen shortage: ऑक्सिजनअभावी दोन जुळ्या मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Twins died due to Oxygen shortage: ऑक्सिजनअभावी दोन जुळ्या मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Twins died due to Oxygen shortage: ऑक्सिजनअभावी दोन जुळ्या मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • Published by:  Sunil Desale

लखनऊ, 24 एप्रिल: देशभरातील बहुतांश भागांत वैद्यकीय ऑक्सिजनचा (Oxygen) तुटवडा जाणवत आहे. ऑक्सिजन अभावी रुग्णांचा तडफडून मृत्यू होत असल्याच्याही बातम्या समोर येत आहेत. आता अशीच एक बातमी उत्तरप्रदेशातील (Uttar Pradesh) बाराबंकी येथून आली आहे. बाराबंकी येथे नवजात जुळ्या मुलांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू (Twins died due to oxygen shortage) झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या जुळ्या मुलांना जन्मत: श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे दोघांनाही ऑक्सिजनची खूपच आवश्यकता होती. मात्र, ऑक्सिजन अभावी या दोन्ही चिमुकल्यांचा तडफडून मृत्यू झाला. या घटनेने एकच हळहळ व्यक्त होत आहे.

ही घटना बाराबंकीमधील अवध चिल्ड्रन रुग्णालयातील आहे. शहरातील कृष्णा रुग्णालयात जुळ्या मुलांचा जन्म झाला होता त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने अधिक उपचारासाठी अवध रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेण्यात आले होते. दोन्ही मुलांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना ऑक्सिजनची आवश्यकता होती.

"मासिक पाळीच्या आधी आणि नंतर 5 दिवस Covid Vaccine घेऊ नये" व्हायरल होणाऱ्या या मेसेजमध्ये किती तथ्य? जाणून घ्या

दोन्ही मुलांना ऑक्सिजन आणि इतर उपचारासाठी अवध रुग्णालयात दाखल करण्यासाठी पालक पोहोचले. मात्र, ऑक्सिजन उपलब्ध नसल्याने रुग्णालय प्रशासनाने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यास नकार दिला. परिणामी या दोन्ही मुलांचा ऑक्सिजन अभावी तडफडून मृत्यू झाला.

तर या घटनेप्रकरणी रुग्णालय प्रशासनाने सांगितले की, आमच्याकडे ऑक्सिजन उपलब्ध नव्हता आणि दोन्ही मुलांना तात्काळ ऑक्सिजनची आवश्यकता होती. ऑक्सिजन उपलब्ध नसल्याने मुलांना रुग्णालयात दाखल करत आले नाही. ऑक्सिजन अभावी त्यांचा मृत्यू झाला. पीडित कुटुंबाने सांगितले की, कृष्णा रुग्णालयात जन्म झाल्यावर त्या मुलांना श्वास घेण्यास त्रास होत होता. ऑक्सिजनची आवश्यकता असल्याने मुलांना आम्ही येथे घेऊन आलो मात्र वेळेवर ऑक्सिजन उपलब्ध न झाल्याने दोघांचाही मृत्यू झाला.

First published:

Tags: Oxygen supply, Uttar pradesh