रशीद किडवई
नवी दिल्ली, 1 डिसेंबर : चीन सीमेवरील तणावामुळे (India China Tension) तिन्ही सैन्यदलांना शस्त्रास्त्र खरेदीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) नेतृत्वाखालील सरकारने विशेष निधी दिला आहे. त्याच पार्श्वभूमीवर अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी (Jawaharlal Nehru) शांततेच्या धोरणामुळे सैन्याचं सशक्तीकरण केलं नाही असा दावाही काही जण करताहेत. पण अशा चर्चा करणाऱ्यांना उत्तर एका नव्या पुस्तकातून मिळत आहे. 1962 मध्ये एशियन न्यूज एजन्सीचे (ANI) प्रमुख असलेले ज्येष्ठ पत्रकार प्रेम प्रकाश (Prem Prakash) यांनी लिहिलेल्या ‘Reporting India – My Seventy Year Journey As A Journalist’ या पुस्तकात काही दावे करण्यात आले आहेत.
पेंग्विन रँडम हाउस इंडियाने हे पुस्तक प्रकाशित केलं आहे. ‘ मला असं वाटतं की ऑक्टोबर 1962 च्या चीनविरुद्धच्या युद्धानंतरचे 20 महिने तत्कालीन पंतप्रधान नेहरूंनी भारतीय सैन्यदलांच्या सबलीकरणासाठी प्रचंड कष्ट घेतले. चीनविरुद्धच्या लढाईत भारताच्या झालेल्या पराभवाला आपण कारणीभूत होतो असं त्यांना मनापासून वाटत होतं आणि भारतीय जनतेच्या मनातील विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी त्यांनी लष्कराचं सबलीकरण केलं होते,’ असं प्रकाश यांच्या पुस्तकात म्हटलं आहे. प्रकाश यांना असं वाटतं की दुसऱ्या महायुद्धाच्या भयंकर परिणामांनंतर कोणताही देश परस्परांतील प्रश्न सोडवण्यासाठी युद्ध करणार नाही असा नेहरूंचा विश्वास होता. पण जेव्हा चीनने भारतावर हल्ला केला तेव्हा या विश्वासाच्या चिंधड्या झाल्याच पण भारतीय लष्कर स्वातंत्र्यानंतर शस्रास्रांनी सज्ज न केल्यामुळे त्यालाही नेहरुंच्या नीतीचा मोठा फटका सहन करावा लागला. प्रकाश हे 1962 च्या युद्धाचे साक्षीदार असून त्यांनी रॉयटर्ससाठी रिपोर्टिंग केलं होतं. त्यांनी आणि जॉर्ज वेगशे यांनी नेहरूंची आसामातील तेजपूरमध्ये भेट घेतली होती आणि भारतीय लष्कराने ब्रह्मपुत्रेचा उत्तर किनारा रिकामा केल्याने भीती वाढल्याचं त्यांना सांगितलं होतं.
प्रकाश यांनी त्यांची निरीक्षण दैनंदिनीच्या स्वरूपात लिहून ठेवली आहेत आणि त्यातूनच त्यांनी पुस्तकासाठी लेखन केलंय. त्यांनी लिहिलंय, ‘आपल्या शांततेच्या धोरणामुळे लष्कराला फटका सहन करावा लागल्याचं नेहरूंच्या मनाला खूप लागलं होतं त्याचा त्यांच्या प्रकृतीवरही परिणाम झाला होता. त्यांनी आधी केलेली चूक सुधारताना मी त्यांना पाहिलंय. त्यांनी लष्कराच्या विस्तारासाठी आधिकाऱ्यांना नोकरी देऊन त्यांना सहा महिन्यांत प्रशिक्षित करण्यासाठी त्यांनी आणिबाणी आयोग सुरू केले. जगभरातील ज्या देशांकडून लष्कराला हवी असलेली शस्र आणायची होती ती आणण्यासाठी वेळप्रसंगी भीक मागायला किंवा कर्ज घ्यायला लागलं तरीही चालेल अशी त्यांची तयारी होती. नेहरू सर्व प्रकारच्या फायली क्लियर करण्यासाठी रात्रंदिवस का करताना मी पाहिलंय.’
प्रकाश यांच्या म्हणण्यानुसार नेहरूंनी त्यांच्या नॉन-अलाइनमेंट पॉलिसीला बाजूला सारून चीनविरुद्धच्या युद्धात अमेरिकी हवाई दलाची मदतही घेतली होती. चीनविरुद्ध भारतीय वायूदल पुरेसं पडणार नाही हे लक्षात आल्यावर नेहरूंनी अमेरिकी हवाई दलाच्या विमानांना भारतात पाचारण केलं होतं. एकीकडे शीतयुद्धात आपण अमेरिकेला पाठिंबा देण्यास तयार नव्हतो आणि दुसरीकडे त्यांची मदत घेत होतो हे आश्चर्यचकित करणारं होतं. पण चीनच्या भीतीपोटी आपल्याला आपली धोरणं गुंडळणं भाग पडलं.
नेहरूंपासून नरेंद्र मोदींपर्यंत सर्व पंतप्रधानांशी संवाद साधण्याची संधी मिळालेले ज्येष्ठ पत्रकार प्रकाश यांनी म्हटलंय की 1962 च्या पराभवानंतर काँग्रेसमधल्याच नेत्यांनी नेहरूंविरुद्ध आघाडी उघडली होती पण सामन्य जनतेने त्यापैकी एकाही निदर्शनात भाग घेतला नव्हता. नेहरूंच्या नीतीमुळे भारतीय लष्कराचा युद्धात पराभव झाल्यामुळे त्यांच्याविरुद्ध एकही मोठं निदर्शन झालं नव्हतं असं त्यांनी लिहिलंय.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांची 22 नोव्हेंबर 1963 ला हत्या झाली होती त्याचदिवशी भारतात मेजर जनरल नानावटी, लेफ्टनंट जनरल बिक्रमसिंह, लेफ्टनंट जनरल दौलतसिंग आणि लष्कराच्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यु झाला होता. लष्करातील इतके उच्चपदस्थ अधिकारी एका वेळी एकाच हेलिकॉप्टरमधून का प्रवास करत होते हे गूढ तसंच गूढच राहिलं त्यासाठीही नेहरूंवर टीका झाली होती. नेहरुंना दोन्ही घटनांचा धक्का बसला होता कारण नेहरूंचे आणि केनेडींच्या कुटुंबाचे खूप चांगले संबंध होते.
केनेडींबद्दल बोलयची विनंती प्रकाश यांनी त्या दिवशी संध्याकाळी नेहरूंना केली होती पण त्यांनी सर्व प्रोटोकॉल पाळून, ठरलेले कार्यक्रम पूर्ण करून मगच अडीच मिनिटांत त्यांची प्रतिक्रिया दिली होती अशी आठवणही प्रकाश यांनी लिहिली आहे. तीन मूर्ती भवनामध्ये पंडितजी होळीला सर्वांमध्ये कसे मिसळत, आपल्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या घरी जाऊन होळी कशी खेळत या आठवणीही प्रकाश यांच्या पुस्तकात आहेत. प्रेम प्रकाश यांनी 1952 मध्ये आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. त्यांनी मिलान, स्वित्झर्लंड आणि ग्रेट ब्रिटनचा प्रवास केला. त्याच्या आठवणीही या पुस्तकात आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.