VIDEO नव्या लष्कर प्रमुखांचा पाकिस्तानला कडक इशारा

VIDEO नव्या लष्कर प्रमुखांचा पाकिस्तानला कडक इशारा

छुपं युद्ध यापुढे चालणार नाही. सर्व लोकांना सर्व काळ तुम्ही मुर्ख बनवू शकत नाही. भारत आता खपवून घेणार नाही.

  • Share this:

नवी दिल्ली 31 डिसेंबर : मेजर जनरल मनोज नरवणे Manoj Mukund Naravane) यांनी आज देशाचे नवे लष्कर प्रमुख म्हणून सूत्रे हाती घेतली. बिपिन रावत(Bipin Rawat) यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारलाय. रावत हे लष्कर प्रमुखपदावरून आज निवृत्त झाले. सरकारने त्यांची CDS(Chief of Defence Staff) म्हणजेच संरक्षण प्रमुखपदावर नियुक्ती केलीय. देशाचे ते पहिलेच संरक्षण प्रमुख असणार आहेत. बिपिन रावत यांच्या उपस्थितीत त्यांनी लष्कराच्या मुख्यालयात सूत्रं स्वीकारलीत. नरवणे हे देशाचे 28वे लष्कर प्रमुख आहेत. नरवणे यांनी आपल्या 37 वर्षांच्या कारकिर्दीत लष्करातल्या विविध पदांवर आणि विविध भागांमध्ये उत्तम काम केलंय. मनोज नरवणे राष्ट्रीय सुरक्षा अकादमी आणि भारतीय सैन्य अकादमीचे माजी विद्यार्थी आहेत. नरवण म्हणाले, दहशतवाद हे पाकिस्तान सरकारचं धोरण झालं आहे. युद्धात जिंकणे शक्य नसल्याने त्यांनी भारताविरुद्ध छुपं युद्ध सुरू केलंय. पण आता हे चालणार नाही. भारत आता खपवून घेणार नाही. सर्व लोकांना सर्व काळ तुम्ही मुर्ख बनवू शकत नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे असा इशाराही त्यांनी पाकिस्तानला नाव न घेतला दिला.

नरवणे यांनी इशान्य भागात अनेक वर्ष काम केलंय. इशान्येतल्या या राज्यांमध्ये चीनची 4 हजार किलोमीटरची सीमा आहे. त्यामुळेच नरवणे यांना चीनविषयीचे तज्ज्ञ समजले जातात. डोकलामचा वाद उफाळलेला असताना तो सोडविण्यासाठी आणि वाटाघाटींमध्येही त्यांची महत्त्वाची भूमिका होती.

मराठमोळे मनोज नरवणे देशाचे नवे लष्करप्रमुख, पदभार स्वीकारला

नरवणे हे बिपीन रावत यांच्यानंतरचे सर्वात ज्येष्ठ अधिकारी होते. त्यामुळे नवे लष्कप्रमुख म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. आपल्या 37 वर्षांच्या कारकिर्दीत नरवणे यांनी लष्करातल्या विविध पदांवर आणि विविध भागांमध्ये उत्तम काम केलंय. मनोज नरवणे राष्ट्रीय सुरक्षा अकादमी आणि भारतीय सैन्य अकादमीचे माजी विद्यार्धी आहेत.

1980 मध्ये त्यांनी शीख लाइट इन्फेन्ट्रीच्या 7व्या बटालियनमधून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. पुण्यातल्या ज्ञानप्रबोधिनी शाळेचे ते विद्यार्थी आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 31, 2019 05:48 PM IST

ताज्या बातम्या