S M L

शेतकऱ्यांच उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्राने घेतला आणखी एक महत्त्वाचा निर्णय

शेतीला पुरक व्यवसायाची जोड दऊन शेतकऱ्यांचं उत्पन्न 2022 पर्यंत दुपटीने वाढविण्याचा सरकारचा निर्णय आहे.

Updated On: Dec 6, 2018 11:10 PM IST

शेतकऱ्यांच उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्राने घेतला आणखी एक महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली, 6 डिसेंबर : केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी नव्या कृषी निर्यात धोरणाला मान्यता दिली. शेतकऱ्यांचं उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्यासाठी केंद्र सरकारने जी योजना जाहीर केली होती, त्यासाठी हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी या निर्णयाची माहिती दिली.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या विकासासाठी अनेक योजना जाहीर केल्या होत्या. त्यातली ही सर्वात महत्त्वाकांक्षी योजना आहे. शेतीला पुरक व्यवसायाची जोड दऊन शेतकऱ्यांचं उत्पन्न 2022 पर्यंत दुपटीने वाढविण्याचा सरकारचा निर्णय आहे.


शेतीमालाची निर्यात करण्यासाठी एका खास गटाचीही स्थापना केली जाणार आहे. हा गट जगभरातल्या कृषी बाजारपेठांवर लक्ष ठेवणार असून मागणी आणि पुरवढ्याची सांगड घालण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होण्याची शक्यता आहे.

Loading...


त्याचबरोबर शेतीमाल निर्यातीची प्रक्रिया अधिक सुलभ आणि सुटसुटीत करण्यात येणार असून शेतकऱ्यांना त्यात सवलतीही दिल्या जाणार आहेत.VIDEO : या पोलीस हवालदाराकडे पाहताना नक्कीच तुमची टोपी पडेल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 6, 2018 11:08 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close