नवी दिल्ली 20 जून: गलवान खोऱ्यात चीनी सैन्याने जो क्रूर खेळ केला त्यामुळे सर्व देशात संतापाची तीव्र भावना आहे. चीनी सैनिकांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात भारताचे 20 जवान शहीद झाले होते. त्यामुळे चीनबद्दल देशात प्रचंड असंतोष निर्माण झालाय. त्या पार्श्वभूमीवर Network18 ने एक देशव्यापी सर्व्हे केला. त्यात जनमताचा कौल स्पष्ट झाला असून 70 टक्के लोकांनी चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची तयारी दाखवली. तर पाकिस्तान नाही तर चीनच भारताचा खरा शत्रू आहे असं तब्बल 92 टक्के लोकांना वाटतं.
Network18 ने आपल्या सर्व वेबसाईट्स आणि सोशल मीडियावर हा सर्व्हे घेतला. त्यात ‘News18 लोकमत’सह सर्व भाषिक वेबसाईट्स, CNN-News18, News18 India, CNBC-TV18, Moneycontrol आणि Firstpost सहभागी झाले होते.
चीनी Apps आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर बहिष्कार घालण्याची आणि त्यासाठी इतरांना प्रेरित करण्याची तयारी 91 टक्के लोकांनी दाखवली. 70 टक्के लोकांनी चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची तयारी दाखवली त्यासाठी जास्त किंमत देण्यास तयार असल्याचंही ते म्हणाले. तर चीनवर विश्वास नसल्याचं 92 टक्के लोकांनी सांगितलं.
मोदींचा Yoga Day यावर्षी डिजिटल; सोशल मीडियावर अवतरले नवे इमोजी
भारतीय सेलिब्रेटिजनी चीनी उत्पादनांच्या जाहीराती करू नये असं मत 97 टक्के लोकांनी व्यक्त केलं. भारताच्या मदतीला धावून येणारा कुठलाही देश नाही. भारताला आपली लढाई स्वत:च लढावी लागेल असं 52 टक्के लोकांनी म्हटलं आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारताचे जवळचे मित्र आहेत असं 18.12 तर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे जवळचे मित्र आहेत असं 19.32 टक्के लोकांना वाटतं.
सुशांत तु घाई का केलीस? बिहारच्या IPS अधिकाऱ्याची काळजाला भिडणारी पोस्ट!
43 टक्के लोकांनी चायनीज फूडवर बहिष्कार घालणार असल्याचं सांगितलं. तर 31टक्के लोकांना वाटतं की या वादाशी अन्नाचा काही संबंध नाही.
या सर्व्हेमध्ये लोकांना 9 प्रश्न विचारण्यात आले होते. त्यात 6 हजार जणांनी आपलं मत नोंदवलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.