Mission Paani एकाही भारतीयाचा शुद्ध पाण्याअभावी मृत्यू होऊ नये म्हणून...

पाण्याचं भीषण दुर्भीक्ष लक्षात घेता, पावसाचा प्रत्येक थेंब वाचवण्याची आवश्यकता आहे. याच उद्देशाने Network18 ने Mission Paani हा उपक्रम सुरू केला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 1, 2019 08:56 PM IST

Mission Paani एकाही भारतीयाचा शुद्ध पाण्याअभावी मृत्यू होऊ नये म्हणून...

मुंबई, 1 जुलै :  नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदाच मन की बातच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. या संवादाचा महत्त्वाचा भाग होता पाणी. जलशक्ती जनशक्ती व्हायला हवी, असं आवाहन मोदींनी केलं. पाण्याचं भीषण दुर्भीक्ष लक्षात घेता, पावसाचा प्रत्येक थेंब वाचवण्याची आवश्यकता आहे. याच उद्देशाने Network18 ने Mission Paani हा उपक्रम सुरू केला आहे. 1 जुलैला 10 रात्री वाजता या उपक्रमाची सुरुवात होईल. या वर्षी भीषण उन्हाळ्याचा भारताच्या मोठ्या भागाला तडाखा बसला. पाण्याच्या काही थेंबांसाठी अनेकांना मैलोन मैल पायपीट करावी लागली. पाण्याच्या दुर्भिक्षावर उपाय शोधण्यासाठी Network18 ने #MissionPaani उपक्रम सुरू केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी चार महिन्यानंतर पुन्हा एकदा ‘मन की बात’च्या माध्यमातून संवाद साधला. त्यामध्ये त्यांनी पाण्याविषयी या महत्त्वाच्या मुद्द्यांना हात घातला.

- पाण्याच्या समस्येवर केलं भाष्य, देशात केवळ 8 टक्के पाणी वाचवलं जातं

- पाण्याची समस्या जाणून त्यावर विचार करण्याची गरज

- देशातील अनेक गावांनी पाणी वाचवण्यासाठी श्रमदान केलं

Loading...

- जन, जन जुडेगा जल बचेगा

- जल संरक्षणसाठी जन आंदोलनाची गरज

- पाणी वाचवण्यासाठी जागृकता अभियानाची गरज

- जल संरक्षणासाठी सर्वांना पुढाकार घेण्याची गरज

- पावसाचं पाणी वाचवण्यासाठी पुढे या

- #janshakti for janshakti वापरण्याचं नरेंद्र मोदीचं आवाहन

देशावर गंभीर पाणीसंकट ! 2020 पर्यंत या शहरांमधील पाणी संपणार

नरेंद्र मोदी यांनी केलेल्या याच आवाहनाला प्रतिसाद देत Network18 ने मिशन पानी हे अभियान सुरू केलं आहे. एकाही भारतीयाचा शुद्ध पाण्याअभावी मृत्यू होऊ नये, हे मिशन घेऊन नेटवर्क18 ने Mission Paani हा उपक्रम सुरू केला आहे. पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे देशाच्या उत्पन्नापैकी 6% वाया जाण्याचा धोका आहे. पाणी वाचवा. एकाही भारतीयाचा पाण्याविना मृत्यू होऊ नये म्हणून #MissionPaani मध्ये सहभागी व्हा. भारतात दरवर्षी 2 लाख लोकांचा शुद्ध पाण्याअभावी मृत्यू होतो. पाण्याचा प्रत्येक थेंब अमूल्य आहे. उद्याच्या भल्यासाठी पाणी वाचवा. Network18 च्या #MissionPaani मध्ये सहभागी व्हा, असं आवाहन करण्यात येत आहे.

...म्हणून मोदींनी केलं बिग बी अमिताभ यांचं कौतुक, शेअर केला हा VIDEO

पाणी संकट दूर करण्यासाठी बजेटमध्ये होऊ शकते 'ही' मोठी घोषणा

पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे. अनेक भारतीयांना या जीवनस्रोतापासून वंचित राहावं लागतं. याची दखल घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांन मन की बात च्या माध्यमातून जलशक्ती अभियानाविषयी सांगितलं. याला पाठिंबा देत बिग बी अमिताभ बच्चन यांनी एक आवाहन केलं. जलशक्ती अभियानाच्या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ प्रसारित झाला आहे. भारत सरकार पाण्याचं दुर्भिक्ष असणाऱ्या भागात जलसंधारणाचं कसं काम करणार आहे, याविषयी अमिताभ यांनी यात माहिती दिली आहे. साध्या शब्दांत आणि प्रभावी पद्धतीने पाणी वाचवण्याचं साधं पण महत्त्वाचं कर्तव्य अमिताभ यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'संचय जल बहतर कल' अशी घोषणा करत अमिताभ या अभियानात सामील झाले आहेत. याची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा घेतली. त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडिओ रिट्वीट केला.अमिताभ यांचे शब्द प्रेरणादायी आहेत. यामुळे प्रत्येकाला जलसंधारणाचं महत्त्व समजेल. पाणी वाचवण्यासाठी प्रत्येक जण पुढे येईल, असं मोदींनी लिहिलं आहे.

अमिताभ यांच्याप्रमाणे अभिनेता आमीर खानने सुरू केलेल्या पानी फाउंडेशनचंही पंतप्रधानांनी कौतुक केलं. आमीर खानचं एक ट्वीट रीट्वीट करत पंतप्रधानांनी आमीरच्या पाण्याविषयीच्या उपक्रमाचं कौतुक केलं.

VIDEO : मुंबईसह राज्यात मुसळ'धार', यासोबत अन्य महत्त्वाच्या 18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 1, 2019 08:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...