मराठी बातम्या /बातम्या /देश /दिल्लीत 'रायझिंग इंडिया समिट 2023'चे आयोजन; न्यूज 18 नेटवर्कचं असणार महत्त्वपूर्ण योगदान

दिल्लीत 'रायझिंग इंडिया समिट 2023'चे आयोजन; न्यूज 18 नेटवर्कचं असणार महत्त्वपूर्ण योगदान

न्यूज 18 नेटवर्क पूनावाला फिनकॉर्प लिमिटेडच्या सहकार्यानं 'रायझिंग इंडिया समिट 2023' चं आयोजन करणार आहे.

न्यूज 18 नेटवर्क पूनावाला फिनकॉर्प लिमिटेडच्या सहकार्यानं 'रायझिंग इंडिया समिट 2023' चं आयोजन करणार आहे.

न्यूज 18 नेटवर्क पूनावाला फिनकॉर्प लिमिटेडच्या सहकार्यानं 'रायझिंग इंडिया समिट 2023' चं आयोजन करणार आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    दिल्ली, 28 मार्च : न्यूज 18 नेटवर्क पूनावाला फिनकॉर्प लिमिटेडच्या सहकार्यानं 'रायझिंग इंडिया समिट 2023' चं आयोजन करणार आहे. ही दोन दिवसीय थॉट-लिडरशीप परिषद भारताच्या जागतिक स्तरावर पोहचण्याचा उत्सव साजरा करणार आहे. हा कार्यक्रम 29 ते 30 मार्च रोजी नवी दिल्लीतील ताज पॅलेस येथे होणार आहे. या कार्यक्रमात भारताचे माननीय उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी, महिला व बालकल्याणमंत्री स्मृती इराणी, माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर या केंद्रीय मंत्र्यांसह विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित व्यक्ती सहभागी होणार आहेत.

    भारताचा जागतिक पॉवर हाउस म्हणून झालेला उदय साजरा करणं आणि भारत जगामध्ये कसा बदल घडवू शकतो यावरील संभाषणांना प्रोत्साहन देणं, हे या 'रायझिंग इंडिया समिट 2023' च्या आयोजनामागील उद्दिष्ट आहे. न्यूज 18 नेटवर्कचे सीईओ अविनाश कौल म्हणाले, "भारताचं रुपांतर एका समृद्ध राष्ट्रात होण्याचा अभिमानास्पद इतिहास लिहिण्याचं काम न्यूज 18 नेटवर्कनं केलेलं आहे. आम्ही दर महिन्याला बातम्या आणि संभाषणांच्या माध्यमातून 69 कोटींपेक्षा जास्त भारतीयांशी संवाद साधतो. जो संवाद उज्ज्वल भविष्याचा मार्ग दाखवण्यास मदत करू शकतो. भारतातील आघाडीच्या विचारांचे जे मंच आहेत त्यापैकी एक महत्त्वाचा विचार मंच म्हणून रायझिंग इंडियानं आपली ओळख निर्माण केली आहे."

    लाखो रुपयांची नोकरी सोडली अन् बनला अभिनेता, आयुष्याला कलाटणी देणारी कहाणी 

    या मंचावर भारत आणि जगभरातील शासन, कला, व्यवसाय आणि शैक्षणिक क्षेत्रांसह विविध क्षेत्रांतील मान्यवर नेत्यांची उपस्थिती असेल. या कार्यक्रमात सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे आदर पूनावाला आणि नीती आयोगाचे सीईओ बी.व्ही.आर. सुब्रह्मण्यम यांसारख्या विचारवंत नेत्यांसह अनेक पॅनल चर्चांचा समावेश असेल.

    'द हिरोज ऑफ रायझिंग इंडिया' या थीमवर आधारित असलेल्या या वर्षीच्या शिखर परिषदेत, आपल्या नेतृत्वाखाली सामाजिक उपक्रमांद्वारे तळागाळात बदल घडवून आणलेल्या सामान्य नागरिकांचा सत्कार केला जाईल. या रिअल लाईफ हिरोंनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवलेले आहेत. त्यांनी जीवनात बदल घडवून आणणारे सोशल आंत्रप्रेन्युअरशिप व्हेंचर्स सुरू केलेले आहेत.

    पूनावाला फिनकॉर्पचे व्यवस्थापकीय संचालक अभय भुतडा म्हणाले, "आमची संघटना व्यक्तींना त्यांची स्वप्नं आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सक्षम बनवण्याच्या सामाईक उद्दिष्टांवर आधारित आहे. या दृष्टिकोनात योगदान देण्यासाठी आणि एक मजबूत व अधिक समृद्ध भारत निर्माण करण्यासाठी न्यूज 18 सोबत काम करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत."

    First published:
    top videos

      Tags: Lokmat news 18