निवडणूक निकालाच्या दिवशी जनतेनं Network18 ला केलं नंबर 1

निवडणूक निकालाच्या दिवशी जनतेनं Network18 ला केलं नंबर 1

23 मे रोजी देशभरातल्या जनतेनं फक्त भाजपलाच निवडलं नाही तर नेटवर्क 18ला निवडून नंबर 1 बनवलं.

  • Share this:

मुंबई, 29 मे : निवडणुकीच्या खऱ्या आणि स्पष्ट बातम्या सर्वात जलद लोकांपर्यंत पोचवण्याच्या बाबतीत लोकसभा निवडणूक 2019मध्ये नेटवर्क 18नं आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. या निवडणुकीच्या काळात नेटवर्क 18 डिजिटलच्या वेबसाइट्सवर 23 मे रोजी निवडणूक निकालांच्या दिवशी 56.2 मिलियन म्हणजेच 5 कोटी 62 लाख लोकांनी लाॅग इन केलं. नेटवर्क 18 डिजिटल या दिवसांमध्ये नंबर 1 राहिलंय. याच काळात टाइम्स इंटरनेटच्या वेबसाइट्सवर 55 मिलियन ( साडे 5 कोटी ) लोकांनी हे निकाल पाहिले.

नेटवर्क18 डिजिटलच्या वेबसाइट्समध्ये News18.com, Firstpost.com, Moneycontrol.com, CNBCTV18.com यांचा समावेश आहे. निवडणूक कव्हरेजमध्ये या वेबसाइट्सनी टाइम्स ऑफ इंडिया, इकॉनामिक टाइम्स, नवभारत टाइम्स और टाइम्स नाऊ यांना मागे टाकलं. युजर्सच्या बाबतीत नंबर 1 बनवलं. टाइम्सजवळ MX Player सारखे दुसरे प्लॅटफाॅर्मही आहेत. त्याद्वारेही त्यांचं निवडणूक कव्हरेज सुरू होतं.

कॉमस्कोर मोबाईल रिपोर्ट : 'NEWS18 लोकमत'ची मोठी झेप, ABP माझा आणि दिव्य मराठीला टाकलं मागे

मोदी सरकारची मोठी तयारी, दिल्ली ते मुंबई धावणार इंजिनरहित ट्रेन, 'इतक्या' तासाचा प्रवास

नेटवर्क 18 डिजिटल निवडणूक कव्हरेजच्या रिपोर्टिंगसाठी हजारो पत्रकार उपस्थित होते. तसंच कटिंग एज प्राॅडक्ट टीम, डिझाइन टीम आणि टेक्निकल टीम यांनीही आपलं काम चोख केलं. News18.com देशातला सर्वात मोठा बहुभाषीय डिजिटल प्लॅटफाॅर्म आहे. इथे तुम्हाला 12 भाषांतल्या बातम्या वाचायला मिळतात. Firstpost.com देशातली सर्वात मोठी ओपिनियन वेबसाइट आहे. तर Moneycontrol.com व्यवसाय आणि उद्योगांच्या बातम्यांसाठी देशातलं सर्वात विश्वसनीय व्यासपीठ आहे.

मोदी सरकारची खास योजना, व्यवसायासाठी गॅरंटीशिवाय मिळतंय 'इतकं' कर्ज

23 मे रोजी लोकसभा निवडणुकींच्या निकालांचं नेटवर्क 18 डिजिटलचं कव्हरेज सर्वात उत्तम आणि मोठं झालं. या कव्हरेजमध्ये स्पष्टता तर होतीच, पण सर्वात वेगवान निवडणुकीचे निकाल, निकालांचं विश्लेषण आणि नव्या तंत्राद्वारे वेबसाइटवर  निवडणुक  निकाल दाखवणं यामुळे नेटवर्क 18 डिजिटलनं सर्वांना मागे टाकलं.

नेटवर्क 18 नं आपलं नाव निवडणूक निकालाआधी सगळ्यांपर्यंत पोचवलंय. प्रत्येक निवडणुकीत नेटवर्क 18नं हे सिद्ध केलंय आणि म्हणूनच 23 मे रोजी लोकांनी नेटवर्क 18वर विश्वास ठेवला. 23 मे रोजी देशभरातल्या जनतेनं फक्त भाजपलाच निवडलं नाही तर नेटवर्क 18ला निवडून नंबर 1 बनवलं. या दिवशी नेटवर्क 18च्या सर्व डिजिटल प्लॅटफाॅर्मवर लोकांनी भरवसा ठेवला.

VIDEO : चंद्रपूर नव्हे सूर्यपूर! कडक उन्हामुळे होतंय अंड्याचं ऑम्लेट

First published: May 29, 2019, 8:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading