लवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...

लवकरच चलनात येणार 75 रुपयाचं नाणं; अशी आहेत वैशिष्ठ्ये...

नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी 30 डिसेंब 1943 रोजी पोर्ट ब्लेयर येथे सर्वप्रथम भारताचा तिरंगा फडकवला होता. त्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भारत सरकार 75 रुपयाचं नाणं जारी करणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 14 नोव्हेंबर :  लवकरच तुमच्या हातात 75 रुपयाचं नाण पडणार आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी 30 डिसेंब 1943 रोजी सर्वप्रथम आंदमान-निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेयर येथे भारताचा तिरंगा फडकवला होता. त्या घटनेला 75 वर्ष पूर्ण होत असल्याने, 75 रुपयाचं नाणं जारी करण्यात येणार असल्याची घोषणा मंगळवारी मोदी सरकारने केली.


पोर्ट ब्लेयर येथे भारताचा तिरंगा फडकविल्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भारत सरकारच्यावतीने जारी करण्यात येत असलेल्या या 75 रुपयाच्या स्मारक शिक्क्याची खास वैशिष्ठ्ये वित्त मंत्रालयाने जारी केली आहेत. पोर्ट ब्लेयरच्या स्मृती जतन करण्यासाठी हे नाणं जारी करण्यात येत असल्याचं वित्त मंत्रालयाने म्हटले आहे.


75 रुपयाच्या नाण्याची वैशिष्ठ्ये...


1 - 75 रुपयाच्या नाण्याचं वजन 35 ग्राम असणार आहे.


2 - 50 टक्के चांदी, 40 टक्के तांबं आणि 5-5 टक्के निकेल आणि जिंक या धातूंपासून हे नाणं बनलेलं राहील.


3 - 75 रुपयाच्या नाण्यावर एका बाजुला सेल्युलर जेल आणि दुसऱ्या बाजूला तिरंग्याला सलामी देताना नेताजी सुभाष चंद्र बोस याचं चित्र असणार आहे.


4 - नाण्यावरील 75 अंकाचा अर्थ अमृतमहोत्सवी वर्षा असं असणार आहे.


5 - तसेच देवनागरी आणि इंग्रजी भाषेत ‘प्रथम ध्वजारोहण दिवस’ असं नाण्यावर लिहिलेलं राहणार आहे.


 याचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 14, 2018 09:24 PM IST

ताज्या बातम्या