• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • 'Maggi'मध्ये होता हा विषारी पदार्थ, 'नेस्ले'ची सुप्रीम कोर्टात धक्कादायक कबुली

'Maggi'मध्ये होता हा विषारी पदार्थ, 'नेस्ले'ची सुप्रीम कोर्टात धक्कादायक कबुली

आता सरकार विरुद्ध 'नेस्ले' हा संघर्ष आता आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण शिशाचं प्रमाण जास्त असल्याच्या कारणावरूनच सरकारने मॅगीवर बंदी आणली होती.

 • Share this:
  नवी दिल्ली, 3 जानेवारी : मॅगीमध्ये शिशाचं प्रमाण होतं, अशी कबुली आता 'नेस्ले इंडिया'नं सुप्रीम कोर्टात दिली आहे. या कबुलीनंतर आता सरकार विरुद्ध 'नेस्ले' हा संघर्ष आता आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण शिशाचं प्रमाण जास्त असल्याच्या कारणावरूनच सरकारने मॅगीवर बंदी आणली होती. 'नेस्ले इंडिया'चं उत्पादन असलेल्या मॅगीबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. मॅगीमध्ये शिशाचं प्रमाण होतं, अशी कबुली या सुनावणीदरम्यान 'नेस्ले' कंपनीच्या वकिलांनी दिली आहे. मॅगीमध्ये शिशासं प्रमाण जास्त असल्याचं सांगत एनसीडीआरसीने मॅगीविरोधात याचिका दाखल केली होती. त्यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. मॅगीवर का आणली होती बंदी? मॅगीमध्ये शिशाचं अतिरिक्त प्रमाण आढळून आल्यामुळे 2015 मध्ये बंदी घालण्यात आली होती. दिल्ली, महाराष्ट्र, केरळ, हरियाणा राज्यासह इतर भागात मॅगीवर बंदी घालण्यात आली होती. बाजारातून मॅगीची उत्पादन मागे घेण्यात आली. या बंदीच्या विरोधात नेस्ले इंडिया कंपनीने हायकोर्टात धाव घेतली होती. काही काळानंतर मॅगीवरील बंदी उठवण्यात आली. पण आता सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेमुळे मॅगी पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे. धक्कादायक VIDEO: गावकऱ्यांनी या व्यक्तीला झाडाला बांधून केली बेदम मारहाण, कारण...
  First published: