संशयामुळे प्रेमाचं नातं कधी दिसलंच नाही, हैवानासारखी केली पत्नीची हत्या 2019 पासून सुरू झाला ताणतणाव 2 नोव्हेंबर 2019 रोजी भारताने हा नकाशा जाहीर केला. यामध्ये लिंपियाधुरा, लिपुलेख आणि कलापानी यांचा समावेश होता. नेपाळने यावर आक्षेप घेतला आणि त्याला प्रत्यक्ष नकाशाच्या विरोधात संबोधलं. दोन्ही देशांमधील वादानंतर हा वाद शांत झाला असला तरी, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चीनच्या सीमेवर असलेल्या गर्बाधार-लिपुलेख रस्त्यानंतर नेपाळनं नवीन वादाला सुरूवात केली आहे. काय आहे कलापानी वाद? कलापानी हे सुमारे 35 चौरस किलोमीटर क्षेत्र आहे आणि ते पिथौरागड जिल्ह्याचा एक भाग आहे. दुसरीकडे नेपाळ सरकारचा दावा आहे की, हा भाग त्यांच्या दार्चुला जिल्ह्यात येतो. 1962च्या भारत-चीन युद्धापासून या भागावर भारतीय आयटीबीपीच्या जवानांचा ताबा आहे. दोन्ही देशांमधील हा प्रश्न सोडवण्यासाठी राजकीय प्रयत्न केले गेले. 1996 मध्ये कलापानी क्षेत्राच्या संयुक्त विकासासाठी महाकाली करारानंतर नेपाळच्या कम्युनिस्ट पक्षाने (सीपीएन-यूएमएल) कलापानीवर दावा करणं सुरू केलं. आनंदाने झेलण्यासाठी वर फेकलेलं बाळ थेट फरशीवर आदळलं, जागीच सोडला जीव धोरणात्मकदृष्ट्या महत्वाचं आहे कलापानी भारत-चीन-नेपाळच्या त्रिकोणी सीमेवरील कलापानी क्षेत्र हे धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचं आहे. नेपाळ सरकारनं असा दावा केला आहे की, 1816 मध्ये तत्कालीन ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात झालेल्या सुगौली करारानुसार कलापानी हे त्यांचं क्षेत्र आहे. पण या कराराच्या अनुच्छेद 5 मध्ये असं म्हटले आहे की, नेपाळ काली (आता महाकाली) नदीच्या पश्चिमेला त्याच्या भूभागावर दावा करणार नाही. 1860 मध्ये या भागात प्रथमच जमीनीचे सर्वेक्षण केलं गेलं. 1929 मध्ये कलापानी हा भारताचा एक भाग म्हणून घोषित झाला आणि त्याला नेपाळनेही पुष्टी दिली. मुलाला कोरोना, कुटुंब क्वारंटाईन केल्याने वडिलांचा मृत्यू, शेवटचा फोन केला आणि.. संपादन - रेणुका धायबरलिम्पियाधुरा, लिपुलेक र कालापानीसहितका भूभाग समेट्दै ७ प्रदेश, ७७ जिल्ला र ७५३ स्थानीय तहको प्रशासनिक विभाजन खुल्ने गरी नेपालको नक्सा प्रकाशित गर्ने मन्त्रिपरिषदको निर्णय । आधिकारिक नक्सा भूमिव्यवस्था मन्त्रालयले छिटै सार्वजनिक गर्दैछ ।
— Pradeep Gyawali (@PradeepgyawaliK) May 18, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.