काठमांडू एअरपोर्टजवळ प्रवासी विमानाला अपघात; 50 जणांचा मृत्यू

सूत्रांच्या माहितीनूसार, अमेरिका-बाग्लादेश हे प्रवासी विमान जेव्हा खाली उतरतं होतं तेव्हा विमानाचा अचानक तोल गेला आणि...

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: Mar 12, 2018 05:04 PM IST

काठमांडू एअरपोर्टजवळ प्रवासी विमानाला अपघात; 50 जणांचा मृत्यू

नेपाळ, 12 मार्च : नेपाळच्या काठमांडू एअरपोर्टजवळ प्रवासी विमानाला मोठा अपघात झाला आहे. अमेरिका-बाग्लादेश या विमानाला हा अपघात झाला आहे. सूत्रांच्या माहितीनूसार, अमेरिका-बाग्लादेश हे प्रवासी विमान जेव्हा खाली उतरतं होतं तेव्हा विमानाचा अचानक तोल गेला आणि त्याच्यातून धूर निघायला सुरुवात झाली आणि हे विमान वेगाने जमिनीवर क्रॅश झालं.

दरम्यान घटनस्थाळी बचावकार्य सुरू आहे. विमानातून 17 प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलं आहे. विमानात एकून 67 प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने अद्याप कोणाच्याही मृत्यूची घटना समोर आली नाही. पण या अपघातात प्रवाशी मृत झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या सगळ्या विमान वेगाने जमिनीवर कोसळल्याने विमानाने पेट घेतला आहे. ही आग विझवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत असं त्रिभुवन विमानतळाचे प्रवक्ता बीरेंद्र प्रसाद यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 12, 2018 03:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...