Home /News /national /

नेहरूंना अपेक्षित होती पाकिस्तानकडून मदत तेही चीनवरुद्ध; त्या वेळी पंंतप्रधानांचं धोरण नेमकं कुठे चुकलं?

नेहरूंना अपेक्षित होती पाकिस्तानकडून मदत तेही चीनवरुद्ध; त्या वेळी पंंतप्रधानांचं धोरण नेमकं कुठे चुकलं?

भारतीय सीमेवर आक्रमण करण्याचा चीनचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी नेहरूंनी पाकिस्तानकडे मदत मागितली होती. त्यावेळी भारताचा पाकशीही सीमा वाद सुरू होता.

  नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर : सध्या भारत-चीनदरम्यान सीमेवर तणावाचं वातावरण आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहलाल नेहरू यांची जयंती (14 नोव्हेंबर) नुकतीच झाली. त्यानिमित्ताने 60 वर्षांपूर्वीच्या भारत-चीन युद्धांसंबधी काही आठवणी पुढे आल्या आहेत. तेव्हाही भारत आणि पाकिस्तान एकमेकांचं मित्र नव्हते आणि तेव्हा पाकिस्तानात लोकशाहीही नव्हती. तरीही नेहरूंनी त्यांच्या आत्मविश्वासावर विश्वास दाखवला होता. फाळणीनंतर दोन वर्षांपर्यंत दोन्ही देशांत युद्धाजन्य परिस्थिती होती. काश्मीर प्रश्न हा संपूर्ण दक्षिण आशियातील महत्त्वाचा मुद्दा झाला होता. अशातच नेहरूंचा राजकीय अंदाज कसा चुकला आणि त्याचा अर्थ काय? अचानकच पाकिस्तानात गेले होते नेहरू - 1960 च्या शेवटी नेहरू गुप्तपणे पाकिस्तानातील मुर्री आणि पिंडीला जाऊन आले होते आणि तत्कालीन पाकिस्तानचे राष्ट्रपती अयुब खान यांच्याशी चर्चा केली होती. चीनच्या सीमेवरील ताण वाढत होता, त्यामुळे नेहरूंना दोन वर्षं आधीच युद्धाची कुणकुण लागली होती. याचविषयावर त्यांनी खान यांच्याशी चर्चा केली होती. त्यांनी भारत-चीनचे काही गुप्त नकाशे खान यांना दाखवून मदतीची अपेक्षा व्यक्त केली होती. पाकिस्तानी सीमेजवळ चिनी सैन्याची पोजिशन कशी आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पण पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिवांनी याबाबत कोणतीही माहिती द्यायला नकार दिला होता, असं गुप्त अहवालांतून लक्षात येतं. (वाचा - LIC ची जबरदस्त पॉलिसी! रोज गुंतवा केवळ 63 रूपये आणि मिळवा 7 लाख, वाचा सविस्तर) नेहरूंनी पाकिस्तानकडून का मदत मागितली होती? - भारतीय सीमेवर आक्रमण करण्याचा चीनचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी नेहरूंनी पाकिस्तानकडे मदत मागितली होती. त्यावेळी भारताचा पाकशीही सीमा वाद सुरू होता. तरीही राज्यसभेत नेहरू म्हणाले होते की, 'जरी भारत-पाकिस्तानमध्ये वाद असले आणि काश्मीरचा मुद्दा मोठा असला तरीही चीनच्या संभाव्य हल्ल्यावेळी शेजारी देश म्हणून पाकची मदत घेणं फायद्याचं ठरलं असतं.'

  (वाचा - एका डेटसाठी अख्खं रेस्टॉरंटचं घेतलं भाड्यानं,गर्लफ्रेंडला 2 वर्षांनंतर कळलं सत्य)

  राज्यसभेत 3 मे 1962 ला नेहरूंनी केलेल्या प्रयत्नाची संपूर्ण माहिती दिली होती. 4 मेला त्यांनी सांगितलं की, भारत-चीन सीमा वाद आणि पाकव्याप्त काश्मीरबाबत चर्चा सुरू केली आहे. या प्रकराबाबत ज्येष्ठ पत्रकार पी. रमण यांनी लेखात म्हटलंय, 22 ऑगस्ट 1962 लाच नेहरूंनी आपला प्रयत्न निष्फळ ठरल्याचं म्हटलं होतं. ते म्हणाले होते की, हे खूपच धक्कादायक आहे. पण वास्तव आहे की, पाकिस्तान सरकार चीनच्या बाजूने आहे. ज्या देशानी साम्यवादाविरुद्ध उभं राहत, आपलं अस्तित्व निर्माण केलं तो शेवटी चीनसोबतच गेला. (वाचा - US Election 2020: डोनाल्ड ट्रम्प यांचं 'गिरे तो भी...', निवडणुकीबद्दल नवा दावा) नेहरूंचा अंदाज किती चुकीचा होता? - जुन्या संसदेतील कागदपत्रांच्या आधारे रमण यांनी लेखात असं म्हटलंय की, नेहरूंनी चीनविरुद्धच्या युद्धाची सगळी माहिती संसदेत दिली होती. चीनशी संबंध ताणले जाण्याआधी सरकार काश्मीरप्रश्नी कारवाईच करत नसल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला होता. तेव्हा नेहरू म्हणाले, 1948 मध्ये लडाखमधील जोझिला पास पाकिस्तानने घेतला होता, पण भारतीय सैन्याने साहसाने तो पुन्हा मिळवला.

  (वाचा - सतत 2 वर्ष घेत होती ड्रग्स, अशी झाली अवस्था; पण 4 महिन्यात बदललं अख्खं आयुष्य)

  भारतीय सीमेत अतिक्रमण करणाऱ्या पाकिस्तानच्या प्रयत्नांची संपूर्ण जाणीव असताना, त्याच देशाकडे दुसऱ्या देशाने केलेल्या अतिक्रमणाविरुद्ध मदत मागण्याऱ्या नेहरूंवर जबरदस्त टीका झाली होती. पण त्यांनी आपल्या इनस्टिंक्टला महत्त्व देण्याचं समर्थन केलं होतं.
  Published by:Karishma Bhurke
  First published:

  Tags: India china, Pakistan

  पुढील बातम्या