चाचा नेहरूंच्या जयंतीनिमित्त बालदिन होतोय साजरा

चाचा नेहरूंच्या जयंतीनिमित्त बालदिन होतोय साजरा

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना इतिहास, राजकारण,साहित्य, संगीत यांच्याबद्दल जेवढं प्रेम होतं त्यापेक्षा जास्त प्रेम त्यांना मुलांबद्दल होतं.

  • Share this:

14 नोव्हेंबर : आज बालदिन. लहान मुलांचे लाडके चाचा नेहरू यांची आज 128वी जयंती.

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना इतिहास, राजकारण,साहित्य, संगीत यांच्याबद्दल जेवढं प्रेम होतं त्यापेक्षा जास्त प्रेम त्यांना मुलांबद्दल होतं.मुलं ही पंडितजींच्या हृदयातला एक अमूल्य ठेवा होता. चळवळी आणि राजकारणाच्या धबडग्यात ते रमायचे ते फक्त बच्चेकंपनीमध्ये आणि मुलांनाही चाचा नेहरू आपलेसे वाटायचे ते त्यांच्या लाघवी स्वभावामुळे.

मुलांमध्ये रमताना ते त्यांच्यातलेच एक होऊन जात. मुलांवरच्या याच त्यांच्या प्रेमामुळे ते सर्वांचे लाडके चाचा नेहरू झाले. त्यामुळेच 14 नोव्हेंबर हा पंडितजींचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा होऊ लागला. मुलं ही देशाचं भविष्य आहेत. त्यामुळे लहान वयात त्यांना योग्य मार्गदर्शन मिळालं तरच ते आदर्श नागरिक होऊ शकतील, याच उद्देशानं पंडितजींनी पंतप्रधान झाल्यावर लहान मुलांसाठी अनेक योजना तयार केल्या आणि त्याची अंमलबजावणी योग्य होते की नाही याकडेही जातीनं लक्षं दिलं.

इंदिराजी लहान असताना त्यांनी आपल्या लाडक्या इंदूला पत्रं लिहिली आणि जगाचा इतिहास सांगितला.त्यांनी लिहिलेली ही पत्रं आजच्या मुलांसाठी एक खास ठेवा आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 14, 2017 10:43 AM IST

ताज्या बातम्या