नेहरूंच्या धोरणांमुळेच काश्मीरच्या विकासात अडथळा, पटेल सोडवू शकत होते समस्या - मोदी

नेहरूंच्या धोरणांमुळेच काश्मीरच्या विकासात अडथळा, पटेल सोडवू शकत होते समस्या - मोदी

काश्मीरची समस्या खूप जुनी आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं म्हणणं आहे. जर हा प्रश्न गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांच्याकडे असता तर काश्मीर प्रश्न कायमचा सुटला असता. पण पंडित जवाहरलाल नेहरू यांनी हा प्रश्न आपल्याकडे ठेवला. त्यानंतर हा वाद सुरूच आहे, असंही ते म्हणाले.

  • Share this:

नवी दिल्ली, 9 एप्रिल : काश्मीरची समस्या ही फक्त अडीच जिल्ह्यांची आहे, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नेटवर्क 18 चे एडिटर इन चीफ आणि सीईओ राहुल जोशी यांनी त्यांची खास मुलाखत घेतली.

काश्मीरची समस्या खूप जुनी आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं म्हणणं आहे. जर हा प्रश्न गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांच्याकडे असता तर काश्मीर प्रश्न कायमचा सुटला असता. पण पंडित जवाहरलाल नेहरू यांनी हा प्रश्न आपल्याकडे ठेवला. त्यानंतर हा वाद सुरूच आहे, असंही ते म्हणाले.

मोदींनी देशाच्या लष्करावर विश्वास व्यक्त केला. जेव्हा आपण एका शत्रूशी लढत असतो तेव्हा लष्करावर अविश्वास दाखवणारी भाषा शत्रूलाच बळ देते. संपूर्ण गोंधळात टाकते. यामुळे जवानांचं खच्चीकरण होतं. त्यामुळेच अशा संकटाच्या वेळी सगळ्या देशाने एका सुरात बोललं पाहिजे. आपणच आपल्या जवानांचा, त्यांच्या पराक्रमाचा गौरव करायला हवा, असं मोदींनी सांगितलं.

एअर स्ट्राइकचा निर्णय कसा घेतला ?

पुलवामा मध्ये सीआरपीएफवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या हल्ल्याला उत्तर देण्याचा निर्णय घेतला. दहशतवादी आणि पाकिस्तानने मोठी चूक केली आहे, अशी घोषणा मी लगेचच केली होती,असं पंतप्रधान म्हणाले. माझी देहबोली आणि माझी भाषा यावरून ते कुणालाही कळू शकेल.

पंतप्रधान म्हणाले, मी कोणताही शॉर्टकट शोधत नव्हतो. म्हणूनच या मुद्द्यावर मी लष्कर, सुरक्षा दलं आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर हळुहळू आम्ही पुढे गेलो.

पुलवामाचा हल्ला करणाऱ्यांना आपल्या लष्कराने ठार केलं. हे मोठं काम होतं पण मी एवढ्यावरच समाधानी नाही. दहशतवाद्यांना जिथे पोसलं जातं तिथे आपण काही केलं नाही तर हे सुधारणार नाही, असं मला वाटलं. मुंबई हल्ला असो किंवा संसदेवरचा हल्ला असो या सगळ्या घटना पाहिल्या तर पाकिस्तानला हेच वाटत होतं की भारत काही करणार नाही. त्यामुळेच त्यांची हिंमत वाढली. यावेळी मात्र आम्हाला वाटलं,आता हे बास झालं. उरी हल्ला झाला तेव्हा आम्ही सर्जिकल स्ट्रइक केला. सर्जिकल स्ट्राइक योग्य नाही, एअर स्ट्राइकचा मार्ग ठीक आहे, असा निर्णय झाला. आम्ही एअर स्ट्राइक यशस्वी केला. सगळ्यांना विश्वासात घेऊन आम्ही हे काम केलं.

==========================================================================================================================================================

VIDEO : शरदराव, तुम्हाला शोभतं का? मोदींनी का विचारला पवारांना सवाल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 9, 2019 05:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading