'नेहरूंनी काश्मीर प्रश्न निर्माण केला, पटेलांना विश्वासात घेतलं नाही', अमित शहांची टीका

'नेहरूंनी काश्मीर प्रश्न निर्माण केला, पटेलांना विश्वासात घेतलं नाही', अमित शहांची टीका

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काश्मीरप्रश्नी संसदेत निवेदन दिलं. दिवंगत पंतप्रधान पंडित जहवारलाल नेहरू यांनीच काश्मीर प्रश्न निर्माण केला, त्यावेळी त्यांनी तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनाही विश्वासात घेतलं नाही, अशी जोरदार टीका अमित शहा यांनी केली.

  • Share this:

नवी दिल्ली, 28 जून : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काश्मीरप्रश्नी संसदेत निवेदन दिलं. दिवंगत पंतप्रधान पंडित जहवारलाल नेहरू यांनीच काश्मीर प्रश्न निर्माण केला, त्यावेळी त्यांनी तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनाही विश्वासात घेतलं नाही, अशी जोरदार टीका अमित शहा यांनी केली.

काँग्रेसने काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा दिला. त्यामुळे काँग्रेसचं युनिट तिथे कधी उभंच राहिलं नाही. काश्मीरची सूत्रं म्हणूनच शेख अब्दुल्लांच्या हातात गेली आणि त्यांनी त्याचा गैरफायदा घेतला, असंही अमित शहा म्हणाले.

आमच्या सरकारने सर्जिकल स्ट्राइक आणि एअर स्ट्राइक केला पण यामध्ये एकाही काश्मिरी नागरिकाचा बळी गेलेला नाही, असं त्यांनी सांगितलं.

'टुकडे टुकडे गँग'

काश्मीरमध्ये भीतीचं वातावरण आहे, असं काहीजण म्हणतात. पण जे देशाच्या विरोधात आहेत त्यांच्या मनात भीती असायलाच हवी. आम्ही टुकडे टुकडे गँग मध्ये सहभागी नाही, आम्ही काश्मिरी लोकांच्या विरोधात नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी अकरावीच्या प्रवेश वेळापत्रकात बदल

काश्मीरमधल्या तरुणांसाठी रोजगार निर्माण करण्यावर आमचा भर आहे आणि ही प्रक्रिया सुरूही झाली आहे, असं अमित शहा यांनी सांगितलं. काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवटीचा कार्यकाळ वाढवण्याला लोकसभेने मंजुरी दिली आहे. डिसेंबर 2018 पासून काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट आहे.

काश्मीर दौरा

गृहमंत्री अमित शहा यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच दोन दिवसांचा काश्मीर दौरा केला. या दौऱ्यामध्ये त्यांनी तिथला सुरक्षा आढावा घेतला. 1 जुलैपासून सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेच्या सुरक्षाव्यवस्थेबद्दलही त्यांनी जाणून घेतलं.

काश्मीरमध्ये अतिरेक्यांशी लढतालढता शहीद झालेले पोलीस अधिकारी अर्शद खान यांच्या कुटुंबीयांचीही अमित शहा यांनी भेट घेतली. सीमेवरच्या हिंसाचारात ज्यांचा बळी गेला आहे त्यांच्या कुटुंबीयांसाठीच्या नुकसान भरपाईत वाढ करण्यात आली आहे, असंही अमित शहा यांनी संसदेत सांगितलं.

काश्मीरमध्ये विद्युत प्रकल्प उभे करण्यासाठी सरकारने निधी दिला आहे. त्यासोबतच आयआयटी, आयआयएमची उभारणी, पायाभूत संरचना यावर आमचा भर आहे, असं ते म्हणाले.

==================================================================================================

VIDEO: लोकसभेत अमित शहांनी केलं काश्मीरच्या निवडणुकांवर भाष्य

First published: June 28, 2019, 5:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading