S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

धक्कादायक !, नीट परीक्षा केंद्रावर महिला परीक्षार्थीला अंतर्वस्त्र काढायला सांगितली

परीक्षा केंद्रावरील अधिकाऱ्यांनी परीक्षेला बसण्याआधी अंतर्वस्त्र काढायला सांगितल्याची माहिती एका महिला परीक्षार्थीने दिली. यासोबतच इतरही काही महिला परीक्षार्थींनादेखील अशाच प्रकारचा अनुभव आला.

Sachin Salve | Updated On: May 8, 2017 05:24 PM IST

धक्कादायक !, नीट परीक्षा केंद्रावर महिला परीक्षार्थीला अंतर्वस्त्र काढायला सांगितली

08 मे : नीटच्या परीक्षेसाठी कन्नूरमधील परीक्षा केंद्रावर गेलेल्या महिला परीक्षार्थीला एका धक्कादायक प्रसंगाला सामोरं जावं लागले. परीक्षा केंद्रावरील अधिकाऱ्यांनी परीक्षेला बसण्याआधी अंतर्वस्त्र काढायला सांगितल्याची माहिती एका महिला परीक्षार्थीने दिली. यासोबतच इतरही काही महिला परीक्षार्थींनादेखील अशाच प्रकारचा अनुभव आला.

सरकारी आणि खासगी महाविद्यालयातील वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी रविवारी नीटची परीक्षा झाली. एका महिला परीक्षार्थीला तिने परिधान केलेल्या कपड्यांवरील पॉकेट्स आणि मेटलची बटणे काढायला सांगण्यात आले. तिने जीन्स घातली होती. त्या जिन्सला पॉकेट्स आणि मेटलची बटणे होती. त्यांनी तिला पॉकेट्स आणि बटणे काढायला सांगितली. त्यानंतर परीक्षा केंद्रापासून तीन किलोमीटर दूर असलेल्या एका दुकानात जाऊन तिच्या वडिलांनी तिला नवीन ड्रेस आणला.

नीट परीक्षा केंद्राजवळील एका मुस्लिम कुटुंबाने परीक्षेला आलेल्या सहा मुलींना टॉप दिले. धक्कादायक बाब म्हणजे परीक्षा केंद्रावरील अधिकारी कोणालाही पूर्ण बाह्यांचे टॉप घालून परीक्षेला बसण्याची परवानगी देत नव्हते. त्यांनी टॉपच्या बाह्या कापून मुलींना परीक्षेला बसण्याची परवानगी दिली, असं एका पालकानं सांगितलं.(संग्रहित छायाचित्र)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 8, 2017 05:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close