मोठी बातमी! कोरोनाचा उद्रेक; NEET PG 2021 परीक्षेलाही स्थगिती

मोठी बातमी! कोरोनाचा उद्रेक; NEET PG 2021 परीक्षेलाही स्थगिती

NEET PG 2021 Exam Postponed: यंदा नीट परीक्षेत 1.7 लाख विद्यार्थी सामील होणार होते. या परीक्षेच्या माध्यमातून मेडिकलच्या विद्यार्थ्यांना सरकारी महाविद्यालयांमध्ये दाखल केलं जातं.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 एप्रिल : देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने केंद्र सरकारने 18 एप्रिल रोजी आयोजित केलेली नीट पीजी (NEET-PG) ची परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी गुरुवारी सायंकाळी ट्वीट करुन याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, कोरोनाची परिस्थिती पाहता या परीक्षेच्या नव्या तारखेची घोषणा केली जाईल. (NEET PG 2021 Exam Postponed)

यंदा नीट परीक्षेत 1.7 लाख विद्यार्थी सामील होणार होते. या परीक्षेच्या माध्यमातून मेडिकलच्या विद्यार्थ्यांना सरकारी महाविद्यालयांमध्ये दाखल केलं जातं.

हे ही वाचा-कोरोना प्रादुर्भावामुळे प्रभावित गरिबांसाठी मोदी सरकारकडून मोठ्या घोषणेची शक्यता

आरोग्य मंत्र्यांनी केलं ट्वीट

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ट्वीट केलं आहे की, कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्या कारणाने भारत सरकारने #NEETPG2021 परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. ही परीक्षा 18 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली होती. परीक्षेची पुढील तारीख कालांतराने ठरविण्यात येईल. मेडिकल विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करता हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, आमच्यासाठी तरुण डॉक्टरांची सुरक्षा सर्वाधित महत्त्वाची आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: April 15, 2021, 7:58 PM IST
Tags:

ताज्या बातम्या