NEET-JEE च्या वादात 1 ऑक्टोबरपासून सुरू होणार कॉलेज; या राज्याने घेतला मोठा निर्णय

NEET-JEE च्या वादात 1 ऑक्टोबरपासून सुरू होणार कॉलेज; या राज्याने घेतला मोठा निर्णय

एकीकडे देशात जेईई आणि नीटच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली जात असताना या राज्याने कॉलेज सुरू करण्याची तारीख जाहीर केली आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 26 ऑगस्ट : देशभरात NEET आणि JEE परीक्षाबाबत सुरू असलेल्या वादादरम्यान कर्नाटक सरकारने  कॉलेज सुरू करण्याची घोषणा केली आहे. बुधवारी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि उच्च शिक्षण मंत्री डॉ. अश्वथ नारायण सीएन यांनी घोषणा केली आहे की, राज्यात येत्या 1 ऑक्टोबरपासून सर्व कॉलेज पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत.

प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री एस सुरेश कुमार यांनी सांगितले की यंदा शैक्षणिक सत्राची सुरुवात 1 सप्टेंबरपासून ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून होईल. मात्र ऑफलाइन क्लास ऑक्टोबर महिन्यापासून सुरू होईल. ते पुढे म्हणाले की राज्य सरकारच्या शिक्षण विभाग हे केंद्र सरकारच्या ऑफलाईन क्लासेसच्या दिशा-निर्देशांची प्रतीक्षा करीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटक सरकारकडून ऑक्टोबर महिन्यात ऑफलाइन क्लासेस सुरू करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. यासोबतच कोरोनाच्या कहरात विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना कशा प्रकारे सुरक्षा दिली जावी, याची प्लानिंग केली जात आहे.

हे वाचा-...तर 10000 रुपयांनी बाईक स्वस्त होण्याची शक्यता, राहुल बजाजांचं वक्तव्य

कोरोना चाचण्यांमध्ये वाढ

एकीककडे राज्य सरकार कॉलेज सुरू करण्याची प्लानिंग करीत आहे, तर दुसरीकडे राज्य सरकार सातत्याने तपासणीची क्षमता वाढवीत आहे. येथील प्रयोगशाळांची संख्या 2 हून आता 108 पर्यंत पोहोचल्या आहेत. गेल्या पाच दिवसात 323753 नमून्यांची तपासणी करण्यात आली आहे. आतापर्यंत 2513555 नमून्यांच्या चाचण्या केल्या जात आहेत. सरकारने सांगितले की त्यांची योजना दरदिवशी 75000 नमून्यांची चाचणी करण्याचा प्रयत्न आहे.

कनार्टकात 25 ऑगस्टच्या सायंकाळपर्यंत कोविड-19 चे 2.91 लाख प्रकरणं समोर आली होती. यामध्ये 2,04,439 लोकं कोरोनामुक्त झाले असून 4,958 लोकांचा मृत्यू झाला आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: August 26, 2020, 6:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading