• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • JEE, NEET च्या परीक्षा 2 महिने पुढे ढकलल्या; या आहेत नवीन तारखा

JEE, NEET च्या परीक्षा 2 महिने पुढे ढकलल्या; या आहेत नवीन तारखा

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी नव्या तारखांची घोषणा केली आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 3 जुलै : JEE आणि NEET ची प्रवेश परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी. जुलैमध्ये होणाऱ्या प्रवेश परीक्षांच्या तारखा दोन महिन्यांनी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक (Ramesh Pokhriyal Nishank) यांनी नव्या तारखांची घोषणा केली आहे. JEE Main 2020 ची परीक्षा आता 1 ते 6 सप्टेंबर दरम्यान होईल, तर NEET 2020 ही परीक्षा आता 13 सप्टेंबरला होईल. JEE ची पुढची परीक्षा JEE Advanced आता 27 सप्टेंबरला होणार आहे. नेशनल टेस्टिंग एजंन्सीच्या (NTA) सूत्रांनुसार, या परीक्षांचे निकाल सप्टेंबरमध्ये घोषित होतील. त्याच्यापुढे प्रवेशप्रक्रिया सुरू होईल.  निकाल लागण्यासाठी सप्टेंबरचा मध्य उजाडू शकतो. त्यामुळे ऑक्टोबरनंतरच नवीन शैक्षणिक वर्षाची सेमिस्टर सुरू होऊ शकते. हे वाचा - कोरोनामुळे चिंताग्रस्त झालेल्या मुंबईकरांना सरकारने दिली गुड न्यूज देशभरात सुरू असलेल्या कोरोनाच्या कहरामुळे सर्वच क्षेत्रांना मोठा फटका बसला आहे. त्यात शिक्षण विभागात तर विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न समोर उभा आहे. अशातच JEE आणि NEET च्या परीक्षा कधी होणार याबाबत विद्यार्थ्यांकडून सातत्याने प्रश्न विचारला जात होता. अनेक विद्यार्थ्यांनी ट्विटरवरुन जुलैमध्ये घेण्यात येणाऱ्या जेईई आणि नीटच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी केली होती. आता जुलैमध्ये होणारी ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
  First published: