NEET Admit card 2019: 'नीट' परीक्षेचं अ‍ॅडमिट कार्ड प्रसिद्ध, 'असं' करा डाऊनलोड

NEET Admit card 2019: 'नीट' परीक्षेचं अ‍ॅडमिट कार्ड प्रसिद्ध, 'असं' करा डाऊनलोड

यावर्षी जवळजवळ 15 लाख उमेदवारांनी NEET मेडिकल एन्ट्रन्स टेस्टचा फाॅर्म भरलाय.

  • Share this:

मुंबई, 16 एप्रिल : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA )नं नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट (NEET) 2019 अ‍ॅडमिट कार्ड आणलंय. अ‍ॅडमिट  कार्ड अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केलंय. उमेदवार आपल्या रजिस्ट्रेशन नंबरवरून अधिकृत वेबसाइटला लाॅग इन करू शकता. वैद्यकीय प्राथमिक परीक्षेसाठी आॅनलाइन अर्जाची प्रक्रिया संपलीय. आता NTA NEET 2019 परीक्षा 5 मे 2019ला होणार आहे.

अ‍ॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी हे करा

स्टेप 1 - हाॅल तिकीट डाऊनलोड करण्यासाठी NEETच्या अधिकृत वेबसाइटवर ntaneet.nic.in जा.

स्टेप 2 - अ‍ॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्याच्या लिंकवर क्लिक करा.

स्टेप 3 - तुमचा लाॅग इन id आणि इतर माहिती भरा

स्टेप 4 - Submit बटण प्रेस करा आणि अ‍ॅडमिट कार्ड डाऊनलोड करा

स्टेप 5 - पेजवर अ‍ॅडमिट कार्ड दिसेल

स्टेप 6 - तुम्ही अ‍ॅडमिट कार्ड डाऊनलोड करा

स्टेप 7  - त्याचं प्रिंटआऊट घ्या

यावर्षी जवळजवळ 15 लाख उमेदवारांनी NEET मेडिकल एन्ट्रन्स टेस्टचा फाॅर्म भरलाय. यात उत्तीर्ण झाल्यावर उमेदवार वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश घेता येतो. गेल्या वर्षी NEET परीक्षा 13 लाख उमेदवारांनी दिली. यावर्षी MHRDनं भारतीय वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांसाठी नियम बदललेत. आता परदेश विद्यार्थ्यांनाही NEET परीक्षा द्यावी लागेल.

गेल्या वर्षी या परीक्षेसाठी ड्रेस कोडसह विविध इलेक्ट्रॉनिक वस्तू , दागिने तसच अन्य साहित्य केंद्रात घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली होती. त्यासाठी सर्व परीक्षा केंद्रे 'नो टॉलरन्स झोन' असतील, असं प्रवेश पत्रावर नमूद करण्यात आलं होतं. तेव्हा परीक्षेला जाण्यापूर्वी सर्व नियम काळजीपूर्व वाचा. नाही तर परीक्षाकेंद्रात गेल्यानंतर नियम पाळले नाही म्हणून तुम्हाला बाहेर बसवण्यात येऊ शकतं.

VIDEO: अमळनेरमध्ये फिटनेस फंडा कामी आला का? गिरीश महाजन म्हणतात...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 16, 2019 03:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading